चिंब भिजलेले, रूप सजलेले…; पर्यटकांना खुणावू लागलाय एकीव धबधबा पहा Video

0
333
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या धबधब्यांतून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. सातारा जिल्ह्यातील असे डोळ्याचे पारणे फेडणारे धबधबे (Satara Waterfalls) पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक भेटी देण्यासाठी फिरायला येतात. सातारा जिल्ह्यातील एकिव धबधबा हा देखील सध्या प्रवाहित झालं असून त्याचे सुंदर मनमोहक दृश्य सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे.

ऐकीव धबधबा कास रोडवर पारंबो फाट्यापासून साधारण चार किलोमीटर अंतरावर आहे. कास पठारावरील पडणारे पावसाचे पाणी या ठिकाणाहून वाहते. धबधबा लहान असून कुटुंबातील व्यक्ती सोबत मनसोक्त भेटण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे. धबधबा अतिशय सुरक्षित आहे. कास पुष्प पठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांनी हा धबधबा आपल्या कुटुंबासोबत हमखास पहावा असा आहे.

सातारा शहरातून बामणोलीला जाणाऱ्या एसटी बसने किंवा खासगी वडापने तसेच स्वतः च्या चारचाकी, दुचाकीने तुम्ही या ठिकाणाला भेट देवू शकता. येथे राहण्यासाठी उत्तम सोय आहे. येथे आल्यानंतर अनेक पर्यटन स्थळे पाहण्यासाठी आहेत. कास पठार, बामणोली, वासोटा किल्ला, यवतेश्वर, वजराई धबधबा आदी ठिकाणे आहेत. एकीव धबधबा, सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धबधबा आहे. हा धबधबा एकिव गावानजीक असून, कास पठाराजवळ आहे. पावसाळ्यात पर्यटकांची येथे खूप गर्दी असते, कारण धबधबा प्रवाहित होऊन खूप सुंदर दिसतो.