औंध पोलिसांकडून वडीत 14 जनावरे जप्त; आठ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

0
914
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील वडी येथे जनावरांची अवैधरीत्या वाहतूकप्रकरणी औध पोलिसांनी १४ जनावरांसह आठ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. फरमान फिरोज बागवान (वय ३०, रा. मंगळवार पेठ, कराड व मदार मिरासाब कुरेशी (वय ३७, रा. कोरेगाव ता. कोरेगाव) असे संशयितांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वडी गावचे हद्दीत मंगळवार सकाळी ११ वाजता पुलाजवळ कच्च्या रस्त्यावर अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करताना ट्रक आढळून आला.

यामध्ये १४ मोठ्या म्हशी अंदाजे प्रत्येकी २५ हजार रुपयांप्रमाणे साडेतीन लाख रुपये व वाहतूकप्रकरणी अशोक लेलंड कंपनीचा ट्रक (एमएच ५०- १८९७) किंमत रुपये आठ लाख असा एकूण अकरा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार श्री. कांबळे करीत आहेत.