वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय युवतीचा इमारतीवरून पडून मृत्यू

0
847
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय युवतीचा कराड तालुक्यातील आगाशिवनगर मलकापूर येथील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

योगेश्वरी निटुरे (वय २२), असे इमारतीवरून पडून मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. कराड येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात परजिल्ह्यांतील एक २२ वर्षीय युवती शिक्षण घेत होती. ती आगाशिवनगर मलकापूर येथील एका इमारतीत वास्तव्यास होती. या इमारतीवरून संबंधित युवती रविवारी सकाळी आठच्या सुमारास पडल्याने गंभीररीत्या जखमी झाली होती.

त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी कराड शहर पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. या दुर्दैवी घटनेनंतर परजिल्ह्यातील एका मोठ्या व्यक्तीची मुलगी असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळेच पोलिसांकडून सखोलपणे या प्रकरणाचा तपास सुरू आहे.