जिल्हा रुग्णालयात कॅथलॅबसह अन्य कामांसाठी 71 लाख मंजूर

0
191
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा रुग्णालय येथे अनेक वर्षांपासून कॅथलॅबसाठी आवश्यक असणारी महत्वाची यंत्रणा, विद्युतपुरवठा कामासाठी निधीची आवश्यकता होती. या कामासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून ७१ लाख ५८ हजार ५३५ रुपये निधीला मंजुरी मिळाली असल्यामुळे सुसज्ज कॅथलॅब लवकरच सुरू होऊन साताऱ्यातच रुग्णांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया होणार आहे.

जिल्हा रुग्णालय येथे कॅथलॅब स्थापन करणेकरिता बांधकाम सुरू आहे. या कॅथलॅब निर्मितीमुळे सातारा जिल्ह्यातील गरीब व गरजू हृदय रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचार मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे हृदय रुग्णांना उपचाराकरिता पुणे, मुंबई अथवा अन्य ठिकाणी जावे लागणार नाही.

सुसज्ज कॅथलॅबमध्ये हृदय रुग्णांकरिता बाह्य रुग्ण सेवा, तसेच ईसीजी, टु-डी ईको व हृदय रुग्णांकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व चाचण्या तसेच ॲन्जीओग्राफी, ॲन्जीओप्लास्टी व बायपास सर्जरी आदी सुविधा मोफत उपलब्ध होणार आहेत. तसेच हृदय रुग्णांकरिता आवश्यक असणारा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असा १० खाटांचा अतिदक्षता विभागही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.