सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळला दुर्मीळ काळा रानकुत्रा

0
229
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | अतिशय दुर्मीळ अशी नोंद असलेला काळा रानकुत्रा (मेलेनिस्टिक) सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आढळून आला आहे. कराड येथील पर्यटक दिग्विजय पाटील हे व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील एका गावात फिरण्यास गेले असता त्यांना हा रानकुत्रा आढळून आला. त्यांनी त्याचे छायाचित्र मोबाईलमध्ये टिपले आहे. दिग्विजय पाटील यांनी घटनेचे महत्त्व ओळखून याची माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिली आहे.

वनविभागाच्या नोंदीनुसार 1936 मध्ये तमिळनाडूतील कोइम्बतूर वन विभागातील गड्डेसल येथे शिकारी, निसर्गशास्त्रज्ञ, कॉफी प्लांटर आणि स्कॉट्समन आर. सी. मॉरिस यांनी एक काळा रानकुत्रा (मेलेनिस्टिक) पाहिल्याची नोंद केली होती.

रानकुत्रा / कोळशिंदा (वाईल्ड डॉग) असे त्याचे शास्त्रीय नाव असून सर्वसामान्यपणे तो रंगाने तांबूस लालसर असतो. रानकुत्र्याचे कान टोकाकडे गोलाकार असतात. हनुवटी खालचा भाग पसराट असतो. त्याच्या शेपटीचा टोकाकडील बहुतांश भाग हा काळसर असतो. उंची 43 ते 45 से.मी.पर्यंत असते. तर शरीराची लांबी 3 फुटापर्यंत असते. नराचे वजन 20 किलोच्या आसपास असून मादीचे वजन नरापेक्षा कमी असते. कळपाने राहणार्‍या या प्राण्याचे वास्तव्य जंगलामध्ये दिसून येते. रानकुत्रा कळपाने शिकार करतात. त्यामुळे त्यांना मोठ्या व ताकदवर प्राण्याची शिकार करण्यास मदत होते. हरीण वर्गातील प्राणी हे त्यांचे आवडीचे खाद्य आहे. कळपातील प्राण्यांची संख्या जास्त असल्यास ते गव्यासारख्या मोठ्या प्राण्यांचीसुध्दा शिकार करतात. जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान पिल्लू बघायास मिळतात. मादी एका वेळी 4 ते 6 पिलांना जन्म देते, असे रोहन भाटे यांनी सांगितले.