महाबळेश्वरकडे जाणारा ‘हा’ रस्ता वाहतुकीसाठी १५ ऑगस्टपर्यंत राहणार बंद

0
671
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पुणे – महाबळेश्वर मार्गावरून जाणारया पर्यटक व प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. प्रवाशी व पर्यटक जर महाबळेश्वरला सुरूर ते वाई मार्गे जाणार असतील तर त्यांना आता या मार्गे जाता येणार नाही. कारण सुरूर ते वाई रस्ता पुलाच्या दुरुस्ती कामासाठी १५ ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आला आहे. यासाठी प्रवाशांनी पर्यायी पाचवड मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सध्या पुणे – महाबळेश्वर मार्गावरील सुरूर ते वाई दरम्यानच्या रस्त्याचे डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू आहे. रस्ता रुंदीकरणाबरोबरच या मार्गावरील पुलाचे नवनिर्माणही केले जाणार आहे. यासाठी या मार्गावरील वाहतूक आजपासून १५ ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आली आहे. या मार्गे वाई, पाचगणी, महाबळेश्वरकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी पुणे-सातारा महामार्गावरील पाचवडहून वाईकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे पुढील कालावधीत वाई, महाबळेश्वरकडे जाणाऱ्या एसटी बसदेखील पाचवडमार्गे जातील.

सुरूर ते वाई या मार्गाचा वापर वाई, महाबळेश्वरसह आंबेनळी घाटातून कोकणात जाणारे प्रवासी करतात. या सर्वच वाहनांना आता पुणे-सातारा महामार्गावरील पाचवडहून वाई गाठावे लागणार आहे. यामुळे वाहनचालकांचे अंतर वाढणार आहे. या बंद करण्यात आलेल्या मार्गावरील गावांतील वाहतूक अंशता सुरू राहणार आहे.