दिवशी घाटात दरडीचा धोका कायम; कोसळलेली दरड एसटी चालक- वाहकांकडून बाजूला

0
636
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सध्या मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे घाट मार्गात दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. दिवशी घाटात दरडी कोसळून आतापर्यंत अनेकदा दुर्घटना घडल्या आहेत. दरडीच्या बाजूला संरक्षक जाळ्या बसवून वर्दळीचा घाटमार्ग सुरक्षित करण्याची मागणीही दुर्लक्षितच आहे.

ढेबेवाडी- पाटण मार्गावरील दिवशी घाटात दिवस- रात्र वाहनांची वर्दळ असते. घाटात पूर्वीपासूनच दरडीचा धोका असल्याने वाहनचालक व प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. आज पहाटे घाटातील श्री दत्त मंदिराजवळ पुन्हा अचानक दरड कोसळली. रस्त्याचा काही भाग दरडीचे दगड आणि मुरुमाने व्यापल्याने केवळ मोटारी आणि दुचाकीच तेथून ये- जा करू शकत होत्या.

मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास येथून पाटणकडे जाणारी पहिली बस तेथे अडकली. सकाळी लवकर कामानिमित्त पाटणला जाणारे नोकरदार, व्यावसायिक आणि नागरिक बसमध्ये होते. त्या वेळी चालक सत्यजित शिर्के, वाहक सतीश रजपूत यांच्यासह राजेंद्र कदम, नीलेश शेवाळे व अन्य काही प्रवाशांनी रस्त्यात कोसळलेल्या दरडीचा भाग बाजूला हटवून बसचा मार्ग मोकळा केला. सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अभियंता गिरीश सावंत यांना दरडीबाबत माहिती मिळताच त्यांनी यंत्रणा पाठवून दरडीचा शिल्लक भागही हटविला. मात्र, अजूनही पावसाळा सुरू झाला की या घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. या ठिकाणी कायमस्वरूपी उपाय योजना करणे आवश्यक आहे.