मस्साजोगची सातारा जिल्ह्यात पुनरावृत्ती; फलटणमध्ये अपहरण करून मुलाच्या पाठीवर वळ उठेपर्यंत मारलं

0
602
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याला हादरवून टाकणारी एक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील फलटण तालुक्यात मस्साजोगची पुनरावृत्ती घडली असून दुचाकीवरून मित्रासमवेत निघालेल्या एका अल्पवयीन मुलाचे काळज-तडवळे फाटा येथे पाच जणांनी अपहरण केले. त्यानंतर पाठीवर वळ उठेपर्यंत अमानुष मारहाण करून खुटे गावाजवळ सोडून त्याला दिले. प्रतीक प्रमोद रणवरे असे मारहाण झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव असून ही पोलिसांनी रात्री अकरा वाजता त्याची सुटका केली. प्रतीकच्या पाठीवर मारहाणीचे वळ उठले असून, मुक्कामार लागल्याने त्यास बारामती येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लोणंद येथील आयटीआयमध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रतीक रणवरे हा महाविद्यालयातून सुटल्यानंतर तो दररोज याच मार्गावरून मित्रासमवेत दुचाकीवरून घरी जात असे. हीच दिनचर्या लक्षात घेऊन अपहरणकर्त्यांनी पाळत ठेवली होती. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता, प्रतीक आणि त्याचा मित्र नेहमीप्रमाणे दुचाकीवरून जिंतीकडे निघाले होते. लोणंदपासून १०-१५ किलोमीटर अंतरावरील काळज-तडवळे फाटा परिसरात आले असता, गतिरोधकाजवळ त्यांच्या दुचाकीचा वेग मंदावला.

त्याचा फायदा घेत दोन मोटारसायकलींवर आलेल्या पाच जणांनी गाडी आडवी मारून त्यांना अडविले. पाचही जणांनी तोंडाला स्कार्फ बांधलेले होते. त्यांनी जबरदस्तीने प्रतीकला गाडीवरून खाली उतरवले व त्याच्या मित्राला तिथेच सोडून दिले. प्रतीकला दुचाकीवर जबरदस्तीने बसवून अपहरण करून ते पसार झाले. खुटे गावच्या हद्दीत त्याला अपहरणकर्त्यांनी सोडून दिले. यानंतर रात्री ११ वाजता पोलिसांनी प्रतीकची सुटका केली. यावेळी त्याच्या पाठीवर मारहाणीचे वळ होते.