दौलतनगरमध्ये तब्बल 13 तोळे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

0
310
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातार्‍यातील दौलतगनर येथील बंद घर चोरट्यांनी टार्गेट करुन 13 तोळे वजनाचे तब्बल 5 लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. घरफोडीच्या या घटनेने दौलतनगर हादरले असून वकील महिलेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुध्द तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चोरीची घटना दि. 5 जून ते 10 जून या कालावधीत घडली आहे. चोरट्यांनी बंद घराचा सेफ्टी लोखंडी दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. इनामदार कुटुंबियांनी किचन कट्ट्याच्या खाली स्टीलच्या डब्यामध्ये सोन्या-चांदीचे ठेवले होते. तो सर्व ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

चोरी झालेल्या ऐवजांमध्ये 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची 5 ग्रॅम वजनाची अंगठी, 30 हजाराचे 6 ग्रॅमचे कानातले, 1 लाखांचे 30 ग्रॅमचे कंगन, 40 हजाराचे 15 ग्रॅमचे पदक, 30 हजारांचे 12 ग्रॅमचे पदक, 1 लाखांच्या 4 तोळे वजनाच्या 9 अंगठ्या, 50 हजारांचे 2 तोळ्याचे कानातले जोड, रोख 25 हजार रुपये, चांदीचे ब्रेसलेट, दोन महागडी घड्याळे, 200 रुपयांची नाणी असा 4 लाख 77200 रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला आहे. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी करुन पंचनामा केला. ठसे तज्ञ तसेच इतर एक्स्पर्ट बोलावून तपासणी केली.