सातारा जिल्ह्यातील ‘हृषीकेश’नी पाडळीत 3 एकरांवर पिकवली कोरफडीची शेती

0
49
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सध्या शेतीमध्ये विविध प्रयोग करून जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये युवा शेतकऱ्यांचे प्रमाण चांगलेच वाढल्याचे पहायला मिळत आहे. कमी कालावधीत कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेता येऊ शकते याचा विचार अलंकार शेतकरी करू लागले आहेत. याचेच उदाहरण म्हणजे सातारा तालुक्यातील पाडळी येथील हृषीकेश ढाणे (Hrishikesh Dhane) या युवा शेतकऱ्याने विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला आणि यशस्वी शेती करून त्यांनी ३ एकर शेतात कोरफडचे (Aloe Vera) चांगले उत्पादन घेतले आहे. त्यांनी घेतलेले शिक्षण आणि शेतीतून घेतलेले उत्पन्न इतर युवा शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी असा आहे.

सातारा जिल्ह्यात अनेक युवा शेतकरी विविध प्रयोग करण्यावर भर देतात; पण आजवर कोरफडीची शेती करण्याचा फारसा कोणी विचार केला नाही. मात्र, या कोरफड शेतीतून देखील चांगले उत्पादन घेता येऊ शकते. हा विचार पाडळी येथील हृषीकेश ढाणे यांनी केला आणि त्यांनी आपल्या ३ एकर क्षेत्र असलेल्या शेतात कोरफडचे पीक उत्पादन घेतले.

शेतीचे शिक्षण घेतलेल्या हृषीकेश ढाणे यांनी कोरफडचे उत्पादन घेण्यासाठी सेंद्रिय पद्धतीचा मार्ग निवडला आणि जलसिंचनासाठी कार्यक्षम तंत्रज्ञान वापरले. यामुळे त्यांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली. त्यांच्या यशस्वी कोरफड शेतीमुळे त्यांना एक नवा मार्ग मिळाला आहे. त्यांच्या या यशस्वी व्यवसायामुळे शेतकऱ्यांसाठी त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.

सातारा तालुक्यातील पाडळी गावात असलेले शेतकरी ज्वारी, बाजरी किंवा सोयाबीनची शेती करतात. त्यांच्याकडून तीन पिकांचे मोठ्या परिमाणात उत्पादनं घेतले जाते. याचा गावातील हृषीकेश ढाणे यांनीही सुरुवातीस ज्वारी, बाजरी आणि सोयाबीनची शेती केली होती. वारंवार तीनच पिकांचे उत्पादन घेतले जात आल्याने काहीतरी वेगळा प्रयोग राबवून भरघोस पिकाचे उत्पादन घ्यावे असे हृषीकेश यांना नेहमीच वाटत असे. त्यातून त्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला. २००७ मध्ये त्यांच्या शेजारील शेतकऱ्याकडून ४ हजार कोरफडची रोपे ऋषिकेश यांनी घेतली. ती आपल्या शेतात लावली. त्यानंतर त्यांनी ३ एकर जागेवर कोरफडची लागवड केली तेव्हापासून आजपर्यंत त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.

WhatsApp Image 2025 04 17 at 2.08.40 PM

25 रुपयेहून अधिक किलो दराने विक्री

कोरफड वेगवेगळ्या जमिनीत सहज उगवते. वर्षभर त्याची काढणी करता येते. त्यामुळेच ऋषिकेशसाठी हे पीक फायदेशीर ठरत आहे. ते पुणे आणि मुंबईतील कॉस्मेटिक आणि फार्मास्युटिकल कंपन्यांना 25 रुपये प्रति किलो दराने कोरफड विक्री करतात. याशिवाय ते सेंद्रिय कीटकनाशके आणि कीटकनाशके तयार करून विकतात. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात आणखी वाढ होते. कोरफडीच्या लागवडीतून त्यांना वर्षाला एक कोटी रुपये मिळतात.

शेतीती कष्ट करण्याची तयारी हवी : ऋषिकेश ढाणे

आज शेती करताना त्यातून कमी वेळेत, कमी कष्टात आणि कमी पाण्यात चांगले उत्पादन काढणे आवश्यक आहे. आतापर्यंत केवळ ज्वारी, बाजरी आणि सोयाबीन, ऊस, हळद आदी पिके भरपूर पैसे देणारी असतात याचाच विचार शेतकरी करत. मात्र, शेतात काहीतरी प्रयोग करण्याचा मी निर्धार केला आणि त्यात सातत्य ठेवले त्यातून २००७ पासून कोरफड उत्पादन घेण्यास सुरुवात केली. आता त्याच्या उत्पादनातून व प्रक्रियेतून चांगले उत्पादन आपण मिळवत आहोत. मात्र, यासाठी मेहनत करण्याची तयारी असायला हवी. आणि ती मी दाखवली व आज यशस्वी देखील झालो असल्याची प्रतिक्रिया युवा शेतकरी ऋषिकेश ढाणे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

कोणत्या प्रकारची जमीन आणि हंगामात अधिक उत्पादन देते

कोरफडीची लागवड कोरड्या भागांपासून ते बागायती मैदानापर्यंत करता येते. आजकाल देशाच्या सर्व भागात याची लागवड केली जाते. कमी पाण्यात आणि अर्ध-शुष्क क्षेत्रातही सहज पिकवता येते. कोरफडीच्या चांगल्या लागवडीसाठी सर्वात योग्य तापमान 20 ते 22 अंश सेंटीग्रेड आहे. ही वनस्पती कोणत्याही तापमानात स्वतःची देखभाल करू शकते. त्याचे उत्पादन IC 111271, IC 111280, IC 111269 आणि IC 111273 या वाणांमध्ये करता येते. यामध्ये आढळलेल्या अॅलोडीनचे प्रमाण 20 ते 23 टक्के असते.