साताऱ्यात गुंतवणूक शिखर परिषद उत्साहात

0
371
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पुणे विभागीय औद्योगिक संचालनलयामार्फत आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल फर्न या ठिकाणी गुंतवणू‍क शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये सातारा जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणुकी विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

या परिषदेला उद्योग विभागाचे विभागीय सह संचालक पुणे विभाग पुणे एस.जी. रजपूत, प्रभारी अपर जिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेश दंडगव्हाळ यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. या परिषदेमध्ये धोरणात्मक निर्णय, गुंतवणूक संधी आणि महाराष्ट्रातील औद्योगिक विकास यावर चर्चा करण्यासाठी एक धोरणात्मक व्यासपीठ म्हणून गुंतवणूक परिषदेचा वापर करण्यात आला.

या परिषदेमध्ये सामंजस्य करार स्वाक्षरीसह धोरणात्मक उपाययोजना आणि गुंतवणूक संधींवर प्रकाश टाकण्यात आला. उद्योग, वस्त्रोद्योग धोरणांसह प्रमुख धोरणांचा समावेश होता आणि स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारांच्या आर्थिक क्षमतेवर भर देण्यात आला, ज्यात महत्त्वपूर्ण गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीच्या उद्दिष्टांचा भर असल्याचे श्री. रजपूत यांनी सांगितले.

अपर जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, सातारा जिल्ह्यात उद्योग गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आहे. पाणी, रस्ते, वीज यासह सर्व सोयी-सुविधा औद्योगिक वसाहतींमध्ये आहे, असे सांगून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेमध्ये सातारा जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांनी जिल्हा उद्योग केंद्राचे कौतुकही केले.