सातारा प्रतिनिधी | राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आज सातारा दौऱ्यावर आले असून त्यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “आज मी साताऱ्यात असतानाच आयटी पार्कचा विषय मार्गी लावून मुंबईला जाणार” असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
साताऱ्यात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भेटीनंतर मंत्री सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आयटी पार्क साताऱ्यात व्हावे, अशी इच्छा मंत्री शिवेंद्रराजे यांची होती, याबाबत त्यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा देखील केला होता. तरुणांना पुण्या मुंबईकडे जाण्यापेक्षा साताऱ्यातच आयटी पार्क व्हावी, अशी त्यांची इच्छा होती.
आज साताऱ्यात आलो असून आयटी पार्क बाबत मंत्री शिवेंद्रसिहराजे भोसले यांच्यासह अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. साताऱ्यातील आयटी पार्कचा विषय मार्गी लावूनच आता मुंबईला जाणार आहे, असे मंत्री सामंत यांनी म्हटले.