केंद्रित गृहमंत्र्यांकडे मुकुंद भवन ट्रस्टच्या CBI चौकशीची लवकरच मागणी करणार : खा. उदयनराजे भोसले

0
342
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा राजघराण्याची काही जमीन मुकुंद भवन ट्रस्टकडून बेकायदेशीरपणे बळकावण्यात आली आहे. या ट्रस्टची चौकशी सीबीआयमार्फत करावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करण्यात येणार आहे. या संदर्भात आज जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची देखील भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

साताऱ्याचे भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खा. उदयनराजे म्हणाले की, “मुकुंद भवन ट्रस्ट प्रकरणात तत्कालीन अधिकाऱ्यांनी आणि राजकीय नेत्यांनी मुकुंद भवन ट्रस्टला सहकार्य केले आहे. हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे.

याप्रकरणी सुनावणी घेण्यात यावी, यासाठी मागील सहा वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, एकदाही सुनावणी घेण्यात आली नाही. यासाठी जिल्हाधिकारी डुडी यांची भेट घेतली असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.