मुंबईतील औषध कंपनीची 14 कोटीची फसवणूक; तळबीड पोलिसांनी उद्योजकास ठोकल्या बेड्या

0
1813
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | मुंबईतील औषध निर्माण कंपनीने कराड तालुक्यातील तासवडे येथील एमआयडीसीतील केमिकल कंपनीसह भूखंड खरेदी करण्यासाठी 14 कोटी 11 लाख रुपये दिले होते. मात्र त्यानंतरही सह्या करण्यास मनाई करत भूखंड हस्तांतर करण्यास नकार दिल्याप्रकरणी उद्योजकासह चौघा जणांवर तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित उद्योजक प्रांजीत पाटील यास अटक केली आहे. तर अन्य संशयितांनी पसार झाले आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, अंधेरी (मुंबई) येथील क्लियर सिंथ लॅब लिमिटेड कंपनीला सातारा जिल्ह्यात केमिकलसह कंपनीसह भूखंड हवा होता. त्यांना कराड येथील तासवडे एमआयडीसीमधील वरूनेश्वर ऑर्गेनेक्स नावाची केमिकल कंपनी भूखंडासह विक्री करण्याचे आहे असे समजल्याने उद्योजक प्रांजित पाटील (रा. वारुंजी, ता. कराड) यांच्याशी संपर्क साधला होता. कंपनीच्या विक्री व्यवहारापोटी प्रांजीत पाटील यांनी मुंबई येथील औषध निर्माण कंपनीकडून 10 कोटी रुपये घेतले. त्यानंतरही जानेवारी 2024 ते मार्च 2025 पर्यंत आणखी 4 कोटी 11 लाख रुपये घेतले.

त्यानंतर औषध निर्माण कंपनीकडून बीटीए रजिस्टरवर सही करण्याची मागणी केली. परंतु प्रांजित पाटील यांच्यासह चौघांनी सही करण्यास नकार दिला. त्यानंतर कंपनीचे संचालक पी. बी. गिरासे यांनी प्रांजित पाटील यांच्यासह चौघांच्या विरोधात कंपनीची 14 कोटी 11 लाख रुपये फसवणूक प्रकरणी तळबीड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.