उप आयुक्तांनी घेतला सातारा जिल्हा परिषदेच्या विभागातील कामांचा आढावा

0
636
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आस्थापना उप आयुक्त नितीन माने, विकास उप आयुक्त विजय मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात विभागस्तरीय आढावा बैठक नुकतीच पार पडली. यानंतर पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास व आस्थापना विभागाच्या उप आयुक्तांनी सातारा जिल्हा परिषदेत विभागातील जिल्हा परिषदेत सुरू असणार्‍या कामांचा आढावा घेतला. यावेळी सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांकडून सविस्तर स्वरूपात माहिती घेतली. यावेळी ग्रामपंचायत आणि सामान्य प्रशासन विभागाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

सातारा जिल्हा परिषदेत पार पडलेल्या महत्वाच्या आढावा बैठकीस सहाय्यक आयुक्त सोनाली घुले यांच्यासह पाच जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी अधिकार्‍यांशी संवाद साधला.

बैठकीत मुख्यमंत्र्याचा 100 दिवस कृती आराखडा, आस्थापनाविषयक बाबी, नवीन निवृत्तीवेतन प्रणाली, भविष्य निर्वाह निधी संकलन प्रणाली, नमो ग्राम सचिवालय बांधकाम योजना, नमो आत्मनिर्भर व सौरऊर्जा गाव अभियान, लोकसेवा हमी कायदा अंमलबजावणी, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत कराची वसूली घरपट्टी व पाणीपट्टी. ग्रामपंचायत स्तरावर 15 टक्के मागासवर्गीय खर्च, 10 टक्के महिला व बालकल्याण खर्च, 5 टक्के दिव्यांग खर्च, जिल्हा वार्षिक योजना, ग्रामपंचायतींना जन व नागरी सुविधांसाठी अनुदान, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनांचा आढावा घेण्यात आला.