दोन कारची समोरासमोर धडक; अपघातात खटावमधील पती-पत्नी जागीच ठार तर 5 जण जखमी

0
2911
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । कडेगाव तालुक्यातील वांगी येथील वाल्मीक नगर परिसरातील जुना सांगली – सातारा रस्त्यावर दोन कारमध्ये झालेल्या भीषण धडकेत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पती-पत्नी जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.

विकास मोहिते (वय ४५) व पुष्पा मोहिते (३८, रा. खटाव, जि . सातारा) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, विकास भिकू मोहिते हे आपल्या कार क्रमांक (एमएच-४२-ए एच-१०४७ )मधून काल, गुरुवार रात्री ११ .४५ दरम्यान ताकारी येथील कार्यक्रम आटपून आपल्या पत्नी व नातेवाईकसह गावी खटावकडे चालले होते. तर जमीर ईलाही आवटी (रा . महाबळेश्वर जि. सातारा) हा महाबळेश्वरकडुन कडेपुर – वांगी मार्गे सांगलीला कार क्रमांक (एमएच-११-डीबी-५७९७) निघाले होते.

वाल्मिकी नगर येथे जमीर आवटी याने भरधाव वेगात समोरून येणाऱ्या कारला जोराची धडक दिली. या भीषण धडकेत विकास मोहिते व पत्नी पुष्पा मोहिते हे जागीच ठार झाले. तर ऋतुजा रोहित तोरसे, विजया प्रकाश तोरसे, आरोही रोहीत तोरसे, आर्या अरुण तोरसे हे गंभीर जखमी झाले. चालक जमीर इलाई अवटी हा ही जखमी झाला. जखमींना कराड येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार करीत आहेत.