सातारा जिल्ह्यात तब्बल 86.72 लाख क्विंटल साखर निर्मिती

0
139
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा हा साखर उत्पादनात नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. नदीकाठ क्षेत्रामुळे जिल्ह्यातील कराड तालुक्यात ऊस उत्पादन जास्त होते. सातारा जिल्ह्यातील १५ कारखान्यांचा गाळप हंगाम संपला असून, केवळ सह्याद्री व कृष्णा या दोन साखर कारखान्यांकडून सध्या गाळप सुरू आहे. यावर्षीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत ८६ लाख ७२ हजार ३७२ क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. उसाचे घटलेल्या क्षेत्रामुळे या वर्षी एक कोटी क्विंटल साखर निर्मितीचा टप्पा कारखान्यांना गाठता आलेला नाही.

तोडणी वाहतूक विस्कळीत असूनही या वर्षीचा गळीत हंगाम तब्बल १७ कारखान्यांनी यशस्वी केला आहे. सह्याद्री व कृष्णा हे दोन कारखाने सुरू असून त्यांचा ही हंगाम अंतिम टप्प्यात आहे. या वर्षी खासगी कारखान्यांनी सर्वांधिक ४६ लाख १६ हजार ९४९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.

तर सहकारी साखर कारखान्यांनी कमी गाळप करूनही जादा साखर निर्मिती केली असून, त्यांना ११ ते १२ टक्क्यांपर्यंत साखर उतारा मिळाला आहे. सर्वाधिक ४९ लाख क्विंटल साखर निर्मिती सहकारी साखर कारखान्यांनी केली आहे. सर्वाधिक साखर उतारा अजिंक्यतारा कारखान्याला १२.६७ व रयत अथणी शुगरला १२.०८ टक्के साखर उतारा मिळाला आहे.

सहकारी कारखाने

जवाहर-श्रीराम कारखाना ४५१८६७ (५२३३५०), कृष्णा कारखाना ११५०८८५ (१३११९६०), किसन वीर भुईंज ३९२९०४ (४१९७००), बाळासाहेब देसाई कारखाना २०५००१ (२४००४०), सह्याद्री कारखाना ८३१३००(९३४२७०), अजिंक्यतारा ५६८०००(६२५५२५), रयत अथणी शुगर ४४३९२३(५३४६७०), प्रतापगड-अजिंक्यतारा कारखाना १९१८०३ (२२३४००), खंडाळा कारखाना १३६९९० (१४३८५०).

खासगी कारखाने

दत्त इंडिया साखरवाडी ६५०५९५ (३४२१००), जरंडेश्‍वर शुगर १३४०५०० (११३४९००), जयवंत शुगर ५५०६४२ (४८२७५०), ग्रीन पॉवर शुगर १५६१२५ (१७४२५०), स्वराज्य ग्रीन पॉवर : ४७५१६१ (२४३२४०), शरयू ॲग्रो ५८८०५३ (४९७५३५), शिवनेरी शुगर्स कोरेगाव ४०५७८३ (४३८६६०), खटाव-माण ॲग्रो पडळ ४५००९० (४०१४००).