सातारा पुन्हा पवारांचा बालेकिल्ला करा; हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांना सूचना

0
646
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा असून जिल्ह्याने देशाला दिशा दिली आहे. लोकसभेला वातावरण होते त्यात विधासभेला आकडे मोड करण्यात महाविकास आघाडीची गाडी निघून गेली आणि पराभव झाला. निवडणुकीत ओव्हर कॉन्फिडन्स नडला आहे. संघटना वाढीसाठी बदल करावे लागतील. सातारा पवार साहेबांचा बालेकिल्ला पुन्हा नव्याने करण्यासाठी कार्यकर्त्यांना काम करावे लागेल, अशा सूचना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केल्या.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रभारी आ. शशिकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, प्रभाकर देशमुख, डॉ. नितिन सावंत, दीपक पवार, राजकुमार पाटील, संजना जगदाळे, संगीता साळुंखे, अर्चना देशमुख, देवराज पाटील उपस्थित होते.

पाटील म्हणाले, राज्यात लोकसभेला वातावरण होते त्यावर विधानसभा लढली गेली. लोकांनी निवडणुका हातात घेतल्या तर बदल नक्कीच घडतो. विधानसभेला आकडे मोड करण्यात गाडी निघून गेली आणि पराभवाला सामोरे जावे लागले. निवडून आलेले महायुतीचे उमेदवार आम्हाला इतकी मते कशी पडली असा ते विचार करत आहेत. आपण कमी कुठे पडलो हे पहायची गरज आहे. जिल्ह्यात चार मंत्री असून अर्थसंकल्पात निधी किती मिळाला? संघटना वाढवायची असेल तर बदल करावे लागतील. तरुणवर्गाला, महिलांना संधी दिली जाणार आहे. पवारसाहेब या वयात काम करत असतील तर आपल्याला काम करावे लागेल. सातारा पवारसाहेबांच्या बालेकिल्ला मानला जायचा आता सोलापूर जिल्ह्याने ती जागा घेतली असून चार आमदार तेथे आहेत. राजकारणात चढ-उतार होत आहेत.

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, ज्या जिल्ह्यात सर्व आमदार-खासदार राष्ट्रवादीचे होते तेथे एकही नेता नाही. ईव्हीएम मशीन हे पराभवाचे खरे कारण आहे. महाराष्ट्रात उत्साह नसून परिवर्तन होईल, अशी आशा वाटते. सातार्‍यात पक्ष पुन्हा जोमाने काम करणार आहे. पक्षाचे विभाजन झाले. अजून कोण कोठे जाईल यावरून कार्यकर्ते डिस्टर्ब झाले आहेत. सत्ता पुन्हा आणणारा नेता आपला आहे. ना उमेद होऊ नका पक्ष मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.

बाळासाहेब पाटील म्हणाले, महायुती सरकार पुढील धोके ओळखून निवडणुका पुढे ढकलायचे काम करत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष वाढीसाठी जोमाने काम करायचे आहे. राज्य सरकारची काम करण्याची पध्दत कशी आहे हे दिसत असून आता त्यावर आवाज उठवला पाहिजे. दिपक पवार म्हणाले, जिल्हाध्यक्षांनी कोणाचे ऐकून काम करु नये. शशिकांत शिंदे दौरे, बैठक घेतात लोकांना ऊर्जा येते, पण ती तात्पुरती राहते, ती कायम राहिली पाहिजे. मोर्चे, बैठक घ्या तरच संघटना जिवंत राहील, असे त्यांनी सांगितले.