धोममधून नियमबाह्य पद्धतीने पाणी सोडल्याने धोम धरण पाणी बचाव समिती आक्रमक; सिंचन प्रकल्पाच्या कार्यालयासमोर केलं ठिय्या आंदोलन

0
484
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । जिहे कटापूर योजनेसाठी वाई तालुक्यातील धोम धरणांमधून नियम बाह्य पद्धतीने पाणी सोडण्यात आले असून हे पाणी तात्काळ बंद करावे अन्यथा आंदोलन करू अशा इशारा धोम धरण पाणी बचाव समितीच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील सिंचन प्रकल्प मंडळाच्या कार्यालयास निवेदनाद्वारे आला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आक्रमक झालेल्या धोम धरण पाणी बचाओ समितीच्या कार्यकर्त्याच्या वतीने सातारा सिंचन प्रकल्प मंडळाच्या कार्यालयासमोर आज ठिय्या आंदोलन करण्यात आले.

वास्तविक जिहे कटापूर पाणी योजना ही चार माही योजना असून नियमबाह्य पद्धतीने या पाण्याचा वापर जिहे कटापूर योजनेसाठी केला जात आहे, असा आरोप धोम धरण पाणी बचाव समितीच्या वतीने करण्यात आलेला आहे. जोपर्यंत धोम धरणातून हे पाणी बंद होणार नाही तोपर्यंत हे ठिया आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.

निवेदनात म्हंटले आहे की, धोमच्या धरणातून कृष्णा नदीपात्रातून जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी दि. १५/०२/२०२५ रोजी पाणी सोडलेले आहे. सदरील माहिती आम्हाला त्याच दिवशी मिळाली होती परंतु १७/०२/२०२५ रोजी कालवा सल्लागार समितीची मिटींग कोयनानगर येथे झाली. या मिटींगमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समोर जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेबद्दल चर्चा झाली. चर्चेदरम्यान या योजनेला आम्ही विरोध मिटींगमध्ये केला होता त्यावेळी जलसंपदा मंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते कि, आपण मार्चमध्ये मुंबई येथे या आपली मिटींग लावू त्यानंतरच पाणी वाटपाबद्दल निर्णय घेऊ. परंतु प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी केली गेलेली नसून धोमच्या धरणातून जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी नियमबाह्य पाणी सोडण्यात आलेले आहे.

त्यामुळे अशा परिस्थितीत नदीपात्रात पाणी सोडून संपूर्ण धोम लाभक्षेत्रातील सिंचन व्यवस्था बाधित होणार असून उभ्या पिकांचे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत येणार आहे. तसेच धोम प्रकल्प अहवाल, कृष्णा नदीवरील उपसा सिंचन योजना यांच्या प्रकल्प अहवालानुसार अशाप्रकारे नदीपात्रात धरणातील साठ्यातून पाणी सोडण्याची कोणतीही तरतूद नाही. गत्तपावसाळ्यात धोम धरणातून ४.६९ टी.एम.सी. पाणी सोडलेले आहे त्यामुळे आज मितीस धोम धरणातील साठ्यामधून पाणी देय नाही याची नोंद घ्यावी.

जिहे-कठापूर उपसा योजना हि चारमाही (खरीप) असून ही पावसाळ्यात वाहून जाणारे ३.१७टी.एम.सी. पाणी दुष्काळी भागासाठी चारमाही योजनेतून देणे आहे. त्या योजनेला पाणी साठवण टैंक कोठेही नाही. तरी त्या योजनेला खरीप हंगामात सोडणेसाठी धोम-बलकवडी धरणातून ०.५३ टी.एम.सी. पाण्याची तरतूद केलेली आहे. त्याचा वापर खरीप हंगामात देणेसाठी आहे, महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण (MWRRA) च्या नियमानुसार जिहे कठापूर योजना हि चारमाहीच आहे त्यामुळे रब्बी व उन्हाळी हंगामासाठी जिहे कठापूर योजनेला धोम-बलकवडी धरणातून पाणी सोडता येणार नाही असे महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण (MWRRA) च्या दि. ०९/०४/२०१९ च्या निकालपत्रात नमूद केलेले आहे. सदर योजनेला घोम-बलकवडी धरणातून रब्बी व उन्हाळी हंगामात पाणी सोडण्यात येऊ नये तसेच महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण (MWRRA) च्या नियमांचे उल्लंघन होणार आहे. तरी हे पाणी सोडण्यासाठी आमचा विरोध आहे.

तसेच जिहे कठापूर उपसा सिंचन योजना हि पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्यावर आहे व ते फ्री कंचमेन्ट एरियातील पाणी आहे आणि ते पाणी १४ ऑक्टोबर पर्यंतच उपसा करण्याची तरतूद आहे. या योजनेचा पाणी साठवण करणेसाठी कोठेही जलसाठा नाही तरी १४ ऑक्टोबर नंतर जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेला नदीप्रवाहातून पाणी उपसणेस पूर्ण बंदी आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचे / जलसंपदा विभाग/ शासन निर्णय क्रमांक: जिहे कठापूर १०१०/पू. क्र. ३६३ / २०१९ / मोत्र-१ मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई ४०००३२, दि. ३०/०८/२०१९ या शासन निर्णयात स्पष्ट शब्दात म्हटले आहे कि, हि योजना (जून ते सप्टेंबर) म्हणजेच चारमाही असून यात १४ ऑक्टोबर नंतर कृष्णा नदी पात्र न आडवता ते खुले करावयाचे आहे अशा स्पष्ट शब्दात शासनाने निर्देश दिलेले आहेत,

०.५३ टी.एम.सी. पाणी सोडण्याची तरतूद धोम-बलकवडी धरणातून आहे ती तरतूद खरोप हंगामापुरती मर्यादित आहे. तरी खरीप हंगाम संपल्यानंतर रब्बी अथवा उन्हाळी हंगामाकरिता पाणी साडता यत नाहा. कारण १४ आक्टोबर ला शिल्लक पाहलल्या पाण्याच नाजन कालवा सल्लागार समिती रब्बी व उन्हाळी हंगामासाठी तरतूद करत असते. दि. ३०/०९/२०२३ च्या फेरजल नियोजनामध्ये धोम व धोम-बलकवडी धरणामध्ये कोणत्याही पाण्याची तरतूद जिल्हे-कठापूर उपसासिंचन योजनेसाठी नाही. धोम धरणातील ४३ गावांचे पुनर्वसन है कोरेगांव तालुक्यात झाले असून या पुनर्वसनासाठी कोरेगांव तालुक्यातील. शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहे. या धरणग्रस्त पुनर्वसितांसाठी व त्यांच्या शेतीसाठी बारमाही पाणी देणे अनिवार्य आहे असे असतानासुद्धा पाणी पुरेसे मिळत नसल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. वाई, सातारा, जावली आणि कोरेगांव या तालुक्यांमध्ये कण्हेर धरणातील व कोयना धरणातील गावे पुनर्वसित केलेली आहेत तरीसुद्धा शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने अन्याय होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.