प्रियांका आंबेकर यांनी स्वीकारला फलटण उपविभागाचा पदभार

0
466
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । फलटण येथे नियुक्त झालेल्या उपविभागीय अधिकारी अर्थात प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांनी आज फलटण उपविभागाचा पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून सौ. प्रियंका आंबेकर या काम पाहिले आहे.

यावेळी फलटण उपविभागीय अधिकारी, फलटण तहसील कार्यालय येथील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अर्थात प्रांताधिकारी सचिन ढोले यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाले.

त्यानंतर फलटणचा कार्यभार हा पर्यवेक्षित उपविभागीय अधिकारी विकास व्यवहारे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलेला होता.