संतोष देशमुखांच्या न्यायासाठी वाईतील कवठेत ग्रामस्थांनी काढला मशाल मोर्चा

0
329
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या खुनात आरोपी असलेल्या वाल्मिकी कराड याचे कारनामे बाहेर येवूनही त्याच्यावर ठोस कारवाई झाली नाही. या निषेधार्थ व देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा, यासाठी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कवठे येथे सर्व ग्रामस्थांच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात आला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयितांना शासन व्हायच्या ऐवजी त्यांना व्ही. आय. पी. वागणूक मिळत आहे. याविरोधात कवठे ग्रामस्थांनी संतोष देशमुखांना न्याय मिळावा व खुन्यांना योग्य शासन व्हावे, या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. मशाल मोर्चा पूर्ण केल्यानंतर सर्व गावकऱ्यांच्या वतीने गावातील भैरवनाथ मंदिर परिसरात सभा घेण्यात आली.

या ग्रामसभेत ग्रामस्थांच्यावतीने आपल्या भावना व्यक्त करून संतोष देशमुख यांच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा करावी. शासनाने जलदगतीने याबाबत निर्णय घेऊन संतोष देशमुखांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.