साताऱ्यात शिवप्रेमी,भाजप कार्यकर्त्यांनी अबू आझमींच्या फोटोला फासले शेण

0
31
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी हिंदुद्वेष्ट्या औरंगजेबाचे कौतुक करत त्याचे उदात्तीकरण केले आहे. या प्रकरणाचा निषेध करताना भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुवारी साताऱ्यात पोवई नाका येथे अबू आझमीच्या फोटोला शेण फासण्यात आले, तसेच जोडे मारून जोरदार घोषणाजी करण्यात आली. यावेळी शिवप्रेमींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अबू आझमी याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे विधानसभा अधिवेशनाच्या कालावधित निलंबन केले आहे. मात्र, निलंबनाची कारवाई पुरेसी नसून त्यांची आमदार पदावरून हकलपट्टी करावी, अशी मागणी भाजच्या वतीने करण्यात आली. या आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी आझमीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, युवा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, मनीषा पांडे, राहुल शिवनामे, शैलेंद्र कांबळे, सदाशिव नाईक, किशोर पंडित, चंदन घोडके, युवराज मोरकर, अश्विनी हुबळीकर, रोहिणी क्षीरसागर, संगीता जाधव, विजय नायक, अविनाश खर्शीकर, अमित काळे, संदीप वायदंडे, अमोल कांबळे यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.