कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी समीर कच्छीसह दोघांना अटक; 2 दिवसांची पोलीस कोठडी

0
455
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आर्थिक कारणातून मटकाकिंग समीर कच्छी शेख याच्यासह साथीदारावर कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. .

समीर कच्छी़ शेख (रा. मोळाचा ओढा), राहूल निंबाळकर (रा.कोंडवे ता.सातारा) अशी अटक केलेल्या व पोलिस कोठडी मिळालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सोहेल इकबाल बागवान (वय 26, रा. कोरेगाव, ता. कोरेगाव) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 3 मार्च रोजी रात्री 10 वाजता 4 लाख रुपये उसने घेतल्याच्या कारणातून समीर कच्छी आणि राहुल निंबाळकर या दोघांनी तक्रारदार बागवान याच्यासोबत वाद घातला. वादावादीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. यावेळी संशयितांनी तक्रारदार यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

याचवेळी संशयितांनी तक्रारदार यांना पाठीत कोयता मारून जखमी केले. कोयता हल्ला झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन्ही संशयितांचा शोध घेतला. त्यानुसार दोघांना अटक करुन गुरुवारी न्यायालयात हजर केले. यावेळी सराकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन दोघांना 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार माने तपास करत आहेत.