घरफोडीच्या आरोपींना 2 तासात अटक करुन 60 हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत; उंब्रज पोलीसांची धडक कारवाई

0
1000
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील उंब्रज पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत चोरीस केलेला सुमारे ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून तिघा आरोपीना देखील ताब्यात घेतले आहे.

रणजीत सोमनाथ चव्हाण (वय 22), संकेत संतोष चव्हाण (वय 19), अमोल रमेश चव्हाण (वय 19, सर्व राहणार लक्ष्मी नगर उंब्रज, ता. कराड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. ०२/०३/२०२५ रोजीच्या रात्री ७.०० वाजता ते दिनांक ०३/०३/२०२५ रोजीच्या सकाळी ९.०० वाजता या दरम्यान मौजे कळंत्रेवाडी येथील सिध्दीविनायक ट्रान्सपोर्ट गोडावूनमधून MRF कंपनीचे भारत बेंज ट्रकचे रबराचे ६० हजार रुपये किंमतीचे चार टायर चोरले गेले. या प्रकरणात उंब्रज पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला आणि तात्काळ कारवाई सुरू केली.

पोलीस सहायक निरीक्षक रविंद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टाफने पेट्रोलींग करीत उंब्रज गावाच्या हद्दीत तीन संशयितांना पकडले. त्यांची ओळख रणजित सोमनाथ चव्हाण, संकेत संतोष चव्हाण आणि अमोल रमेश चव्हाण अशी आहे. हे सर्व संशयित लक्ष्मीनगर, उंब्रज येथील रहिवाशी असून त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आणि चोरलेला सर्व मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले हे करत आहेत.

या कारवाईत पोलीस अधिक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर आणि पो. हवा. संजय धुमाळ, पो. कॉ. राजकुमार कोळी, पो. कॉ. मयूर थोरात, पो. कॉ पो. कॉ. श्रीधर माने, पो. कॉ. प्रशांत पवार यांनी केली आहे.