महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत समन्वय साधण्यासाठी मंत्री शंभूराज देसाईंसह चंद्रकांत पाटलांची नियुक्ती

0
161
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्रात महायुती सरकार येऊन तीन महिने झाले तरी सीमाप्रश्न आणि सीमाभागात मराठी भाषिकांशी समन्वय साधण्यासाठी सीमा समन्वय मंत्र्यांची नियुुक्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे 17 जानेवारी रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत महाराष्ट्रात लढा उभारण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता. इशाऱ्यानातर अखेर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सीमा समन्वय मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. सीमा समन्वय मंत्री म्हणून पर्यटन तथा खाण मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले.

महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी (दि. 28) त्यांच्या नियुक्तीचा अधिकृत आदेश काढला आहे. त्यामुळे मध्यवर्ती म. ए. समितीच्या पाठपुराव्याला यश आले आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव राजेंद्र गायकवाड यांच्या सहीने निघालेल्या पत्रात मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांच्या नियुक्तीची नोंद आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार ही नियुुक्ती करण्यात आली आहे, असे नमूद करण्यात आले असून चंद्रकांत पाटील हे तिसर्‍यांदा सीमा समन्वय मंत्री झाले आहेत. तर शंभूराज देसाई यांच्यावर दुसर्‍यांदा जबाबदारी आली आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत महाराष्ट्रात लढा उभारण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता. त्यावेळी सीमा समन्वयासह इतर मागण्याही उपस्थित करण्यात आल्या होत्या. तसेच सांगली, सातारा, पुणे आणि मुंबई असा लढा जाहीर केला होता. दरम्यान, 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे झालेल्या 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावेळीही मध्यवर्ती समिती नेत्यांनी शरद पवार, मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत आणि इतर मंत्र्यांची भेट घेऊन समस्या मांडली होती.