आमच्या हक्काचे पाणी दुसर्‍याला दिलेले चालणार नाही; पाणी प्रश्नावरून रामराजे झाले आक्रमक

0
402
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांनी फलटण येथे नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फलटणच्या पाण्याच्या संदर्भात आपली रोखठोक भूमिका मंडळी. “ज्यांनी धरणासाठी जमिनी दिल्या, ज्यांचं पुनर्वसन झालं, त्यांचे पाणी काढून नवीन ठिकाणी देणे, हे नैसर्गिक न्यायाला धरून नाही. आमचं पाणी काढून दुसर्‍यांना दिलेलं चालणार नाही. निरा खोर्‍याच्या दुष्काळग्रस्त भागाला पाणी देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. मात्र ज्यांना पाणी मिळतंय त्यांचं पाणी कमी करुन दुसर्‍यांना देणे हे मला मान्य नाही. खंडाळा, फलटण, माळशिरस लाभक्षेत्राला पाणी कमी पडू नये, त्यासाठी कालवा समितीमध्ये रोखठोक भूमिका मांडणार असल्याचे आमदार रामराजे यांनी स्पष्ट केले.

फलटण येथे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या पत्रकार परिषदेस माजी आमदार दीपक चव्हाण, मार्केट कमिटीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.

यावेळी आ.रामराजे पुढे म्हणाले, तसे पहिले तर महत्वाचे असणारे तिसंगी धरण पावसाळ्यात भरले जाते. ते आता उन्हाळ्यातही भरून घेण्याचा घाट कशासाठी केला जात आहे? आम्हाला उपाशी ठेवण्यासाठी काय? माजी आमदार राम सातपुते यांनीही पाणी वाढवून मागितले आहे. त्यांनी वाढवून मागितलेले पाणी आमच्या वाट्यातील न देता माळशिरसच्या वाटयातील पाणी त्यांना द्यावे. आमचे पाणी कमी करून त्यांना अजिबात देऊ नका.

मी दिलेला ‘तो’ प्रस्ताव 5 वर्षापासून शासन दरबारी धूळ खात

खंडाळा, फलटण, माळशिरस लाभक्षेत्राला पाणी कमी पडू नये, ही भूमिका मी समितीमध्ये मांडणार आहे. बंदिस्त पाईप लाईनमुळे निरादेवधरचे वाचणारे पाणी खंडाळा, फलटण, माळशिरस तालुक्यातील लाभक्षेत्राला अगोदर द्यावे. त्यातून पाणी शिल्लक राहिल्यावर अन्य ठिकाणी देण्याचा विचार करा. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आहे. लवादाला डावलून केंद्र सरकारने काही निर्णय घेतले तर निरा खोर्‍यात तीन ते चार टीएमसी पाणी वाढणार आहे. मी तसा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे दिला आहे. तो पाच वर्षापासून धूळ खात पडला असल्याचे आमदार रामराजे यांनी म्हटले.

16 टीएमसी पाणी कुठे गेलं?

माझ्या तालुक्यातलं पाणी कमी करू नका. पाणी वाढवा ते वाढवण्याची संधी आहे. निरादेवधर साडेआठ टीएमसीचे असणारे धरण मी 11 टीएमसी करून घेतले. नाटपी धरण झाले असते तर ते 27 टीएमसी झाले असते मग पंढरपूरपर्यंत पाणी गेले असते. 16 टीएमसी पाणी कुठे गेलं? हे कोणालाच कळत नाही. सध्या 27 टीएमसी नाटपी झाले असरे तर नीरा – देवधरच अकरा टीएमसी त्यातून गेले , उरलेले 16 टीएमसी या पाण्याचा कोणालाच पत्ता नाही. हे पाणी शोधण्याचीही गरज आहे. हे कोणालाच काही कळत नाही. ते पाणी कुठे गेले? अशा सवाल यावेळी आमदार रामराजे यांनी उपस्थित केला.

पाण्यासाठी मी 30 वर्षे झोकून देऊन काम करतोय

निरा खोर्‍याच्या दुष्काळग्रस्त भागाला पाणी देण्याचा माझा कायम प्रयत्न राहील. पाण्यासाठी मी 30 वर्षे झोकून देऊन काम करतोय. माझ्या तालुक्यावर अन्याय होऊ नये एवढीच माझी भावना असल्याचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटले.