सातारा प्रतिनिधी | बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे 4 लाख 82 हजार 500 रुपये किंमतीचे 33 मोबाईल बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी तपास करत मूळ मालकांना परत दिले आहेत.
बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. वाळवेकर यांनी याबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचार्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने सीईआयआर पोर्टल व इतर तांत्रिक माहिती प्राप्त करून महाराष्ट्रातील व परराज्यातील मोबाईल मिळालेल्या लोकांशी नियमित संपर्क साधून गहाळ मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले.
आजपर्यंत 86 मोबाईल नागरिकांना परत देण्यात आले आहेत. सदरची कारवाई ही बोरगांव पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. डी एस वाळवेकर व महीला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती स्मिता पाटील यांचे मार्गदर्शनाखाली बोरगाव पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार पो.ना. प्रशांत चव्हाण, पो. ना. दिपककुमार मांडवे, पो. काँ. सतिश पवार पो. काँ. अतुल कणसे पो काँ केतन जाधव व सायबर पोलीस ठाणेचे पो. काँ. महेश पवार यांनी केली आहे.