सातारा जिल्ह्यात आढळला युरोपीय दुर्मिळ पक्षी; आहे खूप अत्यंत लहान अन् लाजाळू

0
245
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पाहिल्यांदाच युरोपच्या पूर्व भागात, तसेच पालेआर्क्टिक प्रदेशातील बेलन्सची फटाकडी स्थलांतरित, दुर्मिळ पक्षी आढळून आला आहे. दुष्काळी भागातील माण तालुक्यातील किरकसाल येथे नळी या पाणथळीवर हा पक्षी आला आहे. त्याचे निरीक्षण करून ई- बर्ड या आंतरराष्ट्रीय पक्षी निरीक्षण संकेतस्थळावर नोंद करण्यात आली असून, या नोंदीला अधिकृत मान्यताही मिळाली आहे. यामुळे पक्षी निरीक्षक व अभ्यासकांमधून आनंद व्यक्त होत आहे.

बेलन्सची फटाकडी हा पक्षी १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत ग्रेट ब्रिटनमध्ये (Great Britain) प्रजनन करत होता. मात्र, पश्चिम युरोपमध्ये जलसाठ्यांच्या नष्ट होण्यामुळे त्याची संख्या घटली. तथापि, गेल्या काही वर्षांत उत्तर-पश्चिम युरोपमध्ये त्याची पुन्हा वाढ होत असून, जर्मनी आणि नेदरलँड्समध्ये पुनर्वसन झाले आहे. ब्रिटनमध्येही त्याच्या प्रजननाची शक्यता वर्तवली जात आहे. १८५०च्या दशकानंतर प्रथमच २०१२ला आयर्लंडमध्ये या पक्ष्याची नोंद झाली होती.

अत्यंत लहान आणि लाजाळू स्वभावाचा हा पक्षी आहे. तो सहसा पाणथळीतील दाट वनस्पतींमध्ये लपून राहतो. त्यामुळे त्याचे निरीक्षण करणे कठीण असते. त्याची लांबी १६ ते १८ सेंटीमीटर असून, तो थोड्या मोठ्या लिटल क्रेक या पक्ष्यासारखा दिसतो. त्याची चोच लहान, सरळ आणि पिवळसर किंवा हिरवट रंगाची असते. मात्र, तळाशी लालसर रंग नसतो. प्रौढ पक्ष्यांचे वरचे शरीर तपकिरी रंगाचे असते. त्यावर काही पांढऱ्या खुणा असतात.

चेहरा आणि खालचा भाग निळसर- करडा असतो, तर मागच्या पार्श्व भागावर काळ्या- पांढऱ्या पट्ट्यांची रचना असते. त्याचे पाय हिरवट रंगाचे आणि बोटे लांब असतात. लहानशा शेपटीच्या खालील बाजूसही पट्टे असतात. तरुण बेलन्सची फटाकडी प्रौढांसारखीच दिसते. मात्र, तिच्या खालच्या भागावर अधिक पट्टे असतात.