सातारा प्रतिनिधी | कौटुंबिक वादातून पेट्रोल ओतून घर पेटवून देत एक लाख रुपये रोख रक्कम व अर्धा तोळे सोन्याचे दागिने, तसेच कागदपत्रांचे नुकसान केल्याप्रकरणी पतीवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शैलेश नारायण बाबर (रा. वेळे-कामथी, ता. सातारा) असे त्याचे नाव आहे. याबाबत पत्नी प्रियांका शैलेश बाबर (रा. अंबवडे खुर्द, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. कौटुंबिक वादातून पतीने सोमवारी (ता. २४) रात्री पेट्रोल ओतून घर पेटवले.
त्यामध्ये कागदपत्रे, संसारोपयोगी साहित्य, अर्धा तोळे सोन्याची बोरमाळ, बचत गटाचे एक लाख रुपये व घराच्या तुळव्या व दरवाजाचे नुकसान केल्याचे प्रियांका यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार निकम तपास करत आहेत.