सातारा जिल्ह्यातील 3 सहकारी साखर कारखान्यांनी गाळपाचे काम केले पूर्ण; 17 कारखान्याचे ऊस गाळप अंतिम टप्प्यात

0
1519
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील एकूण १७ साखर कारखान्यांनी नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गाळप हंगामात आतापर्यंत ८४ लाख २२ हजार ६०८ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ८० लाख ३७ हजार ३४५ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सातारा जिल्ह्यातील ऊस गाळपाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. या हंगामात 17 पैकी किसन वीर, खंडाळा आणि प्रतापगड-अजिंक्यतारा या 3 कारखान्यांनी गाळपाचे काम पूर्ण केले आहे.

सहकारी साखर कारखान्यांनी सरासरी ११.२९ टक्के साखर उतारा मिळवला आहे, तर खासगी कारखान्यांना ७.९९ टक्के उतारा मिळाला आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याने सर्वाधिक १३ लाख ४० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून ११ लाख ३४ हजार ९०० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. रयत अथणी शुगरने सर्वाधिक १२.०८ टक्के साखर उतारा मिळवला आहे. उर्वरित कारखान्यांनी मार्चअखेरपर्यंत गाळप पूर्ण करण्याची शक्यता आहे.

यावर्षी साखर उताऱ्यात सहकारी साखर कारखाने आघाडीवर दिसत आहेत. आता गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करू लागला आहे. खासगी कारखान्यांनी ४४ लाख ५९ हजार ७५१ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३५ लाख ६४ हजार २५५ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. त्यांना ७.९९ टक्के सरासरी उतारा मिळाला आहे, तर सहकारी साखर कारखान्यांनी ३९ लाख ६२ हजार ८५७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४४ लाख ७३ हजार ९० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. त्यांना सरासरी ११.२९ टक्के साखर उतारा मिळालेला आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याने सर्वाधिक १३ लाख ४० हजार ५२० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ११ लाख ३४ हजार ९०० क्विंटल साखरेची निर्मिती करत आघाडी घेतली आहे, तर सर्वाधिक १२.०८ टक्के उत्तारा रयत अथणी शुगरला मिळाला आहे.