सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील विलासपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराच्या उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. शिवजयंती समारंभाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात त्यांनी या मंदिरासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमात मर्दानी खेळांच्या सादरीकरणाचे त्यांनी कौतुक केले.
सातारा जिल्ह्यासह सर्वत्र नुकतीच मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. या दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी शाही मिरवणुका देखील काढण्यात आल्या. सातारा जिल्ह्यातील विसापूर येथे देखील काहण्यात आलेल्या शाही मिरवणुकीत पारंपरिक वेश परिधान केलेले मावळे, झांजपथक, लेझीमपथक, गजी नृत्य, दांडपट्टा, मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला फिरोज पठाण, बाळासाहेब पिसाळ, अभयराज जगताप, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंतीदिनी शिवमूर्तीचे व शिवज्योतीचे पूजन झाल्यानंतर विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली.
यावेळी फिरोज पठाण यांनी विलासपूर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराची मागणी केली. ही मागणी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तत्काळ मान्य करत त्यासाठीची प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. आता प्रत्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी मंदिर उभारणीचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.