राष्ट्रवादीच्या ‘स्वराज्य सप्ताह’ निमित्त मंत्री मकरंद आबांनी हातात झाडू घेत प्रतापगडवर केली स्वच्छता

0
231
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधत किल्ले प्रतापगड येथे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्साहात साजरी झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवजयंती निमित्ताने आयोजित केलेल्या स्वराज्य सप्ताह व किल्ले, गडकोट स्वछता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी स्वतः मंत्री मकरंद पाटील यांनी हातात झाडू घेऊन प्रतापगड किल्ल्याची स्वच्छता करण्यास सुरुवात केली.

छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन पालखीमधील शिव प्रतिमेला वंदन करुन मकरंद पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांनी शिवकालीन गाणी व विविध कार्यक्रम सादर करुन मान्यवरांची दाद मिळवली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीन शिवजयंती निमित्ताने आयोजित केलेल्या स्वराज्य सप्ताह व किल्ले, गडकोट स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. स्वतः मंत्री मकरंद पाटील यांनी हातात झाडू घेऊन प्रतापगड किल्ल्याची स्वच्छता सुरु केली.

सोबतच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन करुन हे स्वच्छता अभियान यशस्वी केले. याप्रसंगी फलटणचे आमदार सचिन पाटील, राजेंद्र राजपुरे, प्रमोद शिंदे, बाळासाहेब सोळसकर, संजय देसाई, मनोज पवार, मंगेश धुमाळ, महादेव मस्कर, संजय गायकवाड, सरचिटणीस निवास शिंदे तसेच माजी नगरसेवक, पदाधिकारी व सातारा जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.