NCB च्या मुंबई युनिटची कोरेगाव तालुक्यात मोठी कारवाई; अधिकाऱ्यांकडून संशयित आरोपींची घराची तपासणी

0
1610
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या एका मोठ्या कारवाईमुळे एकाच खळबळ उडाली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) मुंबई युनिटने कोरेगाव तालुक्यातील बिचुकलेमध्ये नुकतीच एक मोठी कारवाई केली आहे.पथकाने जानेवारी महिन्यात केलेल्या कारवाईत 200 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले असून त्यामध्ये कोकेन, गांजा व कॅनेबीज या प्रकारच्या जवळपास 22 किलो अंमली पदार्थांचा समावेश आहे. या कारवाईत चौघांना पथकाकडून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले संशयित आरोपी हे कोरेगाव तालुक्यातील आहेत. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील बिचुकलेसारख्या गावातील व्यक्तींचा समावेश मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात साअसल्याचे समोर आले आहे.

मुख्य संशयित सिद्धेश पवार, ऋषीकेश पवार, प्रतीक पवार प्रथमेश पवार अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, एनसीबी मुंबईचे विभागीय अतिरिक्त आयुक्त अमित घावटे यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी महिन्यात 200 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले होते. त्या कारवाईनंतर एका आंतरराष्ट्रीय कुरिअर कंपनीच्या कार्यालयात ऑस्ट्रेलियाला जाणार्‍या पार्सलची तपासणी करण्यात आली. तेथून प्राप्त माहितीच्या आधारे तांत्रिक व गोपनीय माहितीचा अभ्यास करण्यात आला. यातूनच आणखी अंमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती मुंबई विभागीय युनिटला मिळाली. याचदरम्यान ते अंमली पदार्थ नवी मुंबई भागात असल्याचे समोर आले.

संशयितांकडून 1 लाख 60 हजार रुपयांची रोख रक्कमही जप्त

टीमने टाकलेल्या छाप्यात अंमली पदार्थांचा मोठा साठा हाती लागला. या कारवाईत उच्च दर्जाचे 12 किलो कोकेन, 5 किलो वजनाचा हायड्रोपोनिक गांजा व 6 किलो वजनी कॅनाबीज जप्त करण्यात आले. या अंमली पदार्थांची 200 पाकिटे होती. तसेच संशयितांकडून 1 लाख 60 हजार रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली. या कारवाईत चार संशयितांना अटक करण्यात आली.

अंमली पदार्थ विरोधी 5 संबंधित अधिकारी गावात तळ ठोकून

मुंबईतील एनसीबीच्या या कारवाईनंतर कोरेगाव तालुक्यातील बिचुकले येथे अंमली पदार्थ विरोधी सेलच्या मुंबई शाखेच्या अधिकार्‍यांकडून काही संशायास्पद बाबींची तपासणी करण्यात आली. मात्र, या तपासाबाबत गोपनियता बाळगण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार मुळचा बिचुकले येथील परंतु कामासाठी मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या एका तरुणाचा अंमली पदार्थांशी संबंधित घटनेत संशयास्पद संबंध आहेत. अंमली पदार्थ विरोधी सेलच्या अधिकार्‍यांनी त्यानुसार बिचुकले गावात तपासणी केली. यासाठी पाच संबंधित अधिकारी गावात तळ ठोकून होते.