स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार डॉ. भरत वतवाणी यांना जाहीर; उंडाळेत 18 रोजी पुरस्काराचे वितरण

0
336
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | संतोष गुरव

कराड तालुक्यातील उंडाळे येथील स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या ५१ व्या स्मृतीदिनानिमित्त ४२ वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळावा मंगळवार दि १८ फेब्रुवारी २०२५ रोजी होत आहे. अधिवेशनात यावर्षीचा मानाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वतवाणी (Bharat Vatwani) यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त व रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड उदयसिंह पाटील, विश्वस्त प्रा गणपतराव कणसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी प्रा. धनाजी काटकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी ॲड. उदयसिंह पाटील म्हणाले की, पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी प्रमूख पाहुणे म्हणून माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत (निवृत्त) यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मंगळवार दि. १८ रोजी दुपारी दोन वाजता स्वा. दादा उंडाळकर स्मारक मदीर उंडाळे येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे.

डॉ. भरत वतवाणी यांचे रस्त्याने फिरणारे मनोरुग्ण यांच्या बाबतीत मोठे कर्य असून त्यांनी आजपर्यंत तब्बल ७००० रुग्णांवर उपचार करुन त्यांना त्यांच्या घरी पाठवले आहे वतवाणी यांचा जन्म कोलकता येथील तर त्याचे शिक्षण मुंबई येथे झाले. १९८८ पासून त्यांनी मनोरुगणासाठी श्रध्दा पूनवर्सन केंद्र स्थापन केले आज कर्जत येथे ही केंद्र सुरु असून १२० मनोरुग्ण उपचार घेत आहेत. या कार्याची दखल घेवून सन २०१८ मध्ये फिलीफाईन सरकारने त्यांचा रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरव केला आहे. सदर राष्ट्रीय कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्रय सैनिकांचे वारसदार, माजी सैनिक उपस्थित राहणार असून तालुक्यातील शेतकरी, माजी सैनिक, युवक, महिला यांना मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वा. दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने शेवटी अॅड उदयसिंह पाटील उउंडाळकर यांनी केले.

या बरोबर त्यांचे समाजकार्य सुरु असून या एकंदरीत योगदानाबददल श्री वतवाणी यांचा यावर्षीचा स्वा. दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. माजी मंत्री स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांनी वडील स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय स्वातंत्र्य सैनिकाचे अधिवेशन व समाजप्रबोधन कार्यक्रम सुरु केले होते १९७७ पासुन ही परंपरा अखंड सुरु आहे उडाळकर यांच्या पश्चात स्मारक समितीने अॅड. उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही परंपरा पूढे सुरु ठेवली आहे. स्व विलासराव पाटील उंडाळकर यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता.

आतापर्यंत विविध मान्यवरांना पुरस्काराचे वितरण

स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्काराने आतापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे यामध्ये स्वातंत्र्य सेनानी माजी राजदूत एन जी. गोरे सुप्रसिध्द कवी ना. धो. महानोर, स्वातंत्र्य सेनानी श्रीमती उषा मेहता, स्वा से गोविंदभाई श्रॉफ, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती निर्मलाताई देशपाडे सामाजिक कार्यकर्ते मोहन धारीया स्वा से व साहित्यिक जी पी प्रधान, प्रसध्दि शास्त्रतज्ज्ञ डॉ वसतराव गोवारीकर, सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे, सामाजिक कार्यकर्ते शांताराम गरुड, शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य पी बी पाटील, स्वा सै. प्रभाकररावजी कुंटे, न्यायमूर्ती पी बी. सावंत, कृषीतज्ज्ञ डॉ जयंत पाटील, पत्रकार पी साईनाथ प्रसिध्द वकील अॅड उज्ज्वल निकम, डॉ. अभय बंग, जे जे रुग्णालयाचे नेत्रतज्या तात्याराव लहाने नार्बाडचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, अर्थशास्त्रतज्ज्ञ निळकंठ रथ, लेखक व विचारवंत डॉ सदानंद मोरे डॉ प्रकाश आमटे, स्वातंत्र्य सेनानी भाई वैद्य लेखक सुरेश द्वादशीवार, डॉ. विवेक सावंत प‌द्मश्री डॉ गणेश देवी पदमश्री प्रतापसिंह जाधव, अभिनेते मकरंद अनासपुरे, अशोक जैन यांचा समावेश आहे.