सातारा प्रतिनिधी । संतोष गुरव
सातारा जिल्ह्यात 25 नोव्हेंबर 2024 पासून पशुगणना करण्यास पशु संवर्धन विभागाच्या वतीने सुरुवात करण्यात आली. सुमारे दीड महिन्यात जिल्ह्यात 226 प्रगणक व 54 पर्यवेक्षकांमार्फत मोबाइल ॲपच्या माध्यमातून ही पशुगणना प्रत्यक्षात केली जात आहे. सुमारे 1 हजार 300 गावांपैकी 520 गावातील पशुगणना पूर्ण झाली असून 780 गावांमध्ये कार्यवाही सुरू आहे.
पशु संवर्धन विभागाकडे यापूर्वी असलेल्या नोंदीनुसार यामध्ये गायीची संख्या 3 लाख 52 हजार 436, म्हैशी 3 लाख 26 हजार 896, शेळ्या 3 लाख 64 हजार 348, मेंढ्या 1 लाख 85 हजार 905 तसेच डूक्कर 313 इतकी संख्या आहे. सातारा जिल्ह्यातील गावोगावी पशुगणनेची मोहीम पशुसंवर्धन विभागामार्फत यद्धपातळीवर राबवली जात आहे.
राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत दर पाच वर्षांनी पशुगणना होत असते. यावर्षी 25 नोव्हेंबरपासून या पशुगणनेस सातारा जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने दि. 28 फेब्रुवारी अखेर पशुगणना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पशुसंवर्धन विभागासमोर ठेवले आहे. तसेच पहिल्यांदाच ही पशुगणना मोबाईल अॅपवर करण्यात येत आहे. 16 प्रकारच्या जनावरांची गणना केली जात आहे. ग्रामीण व शहरी भागासाठी 216 प्रगणक व 46 पर्यवेक्षकांमार्फत ही गणना करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली, खंडाळा तालुक्यातील काही गावे दुर्गम व डोंगरी भागात आहेत. त्यामुळे गणनेसाठी गेलेल्या प्रगणकांना नेटवर्कच्या अडचणी येत आहेत.
पशुगणनेसाठी 15 दिवसांचा कालावधी…
सातारा जिल्ह्यात १ हजार ९८४ गावे आहेत. त्यापैकी १ हजार ३०० गावात पशुगणनेचे काम प्रगतिपथावर आहे. आतापर्यंत 520 गावांत पशुगणना पूर्ण झाली आहे. पशुगणनेसाठी १४ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व गावातील पशुगणना पूर्ण होणे आवश्यक आहे.
‘या’ प्राण्यांच्या घेतल्या जात आहेत नोंदी
कुटुंब घरगुती उद्योग व इतर संस्थांकडून पाळलेल्या गायवर्ग, म्हसवणे, मिथुन, याक, मेंढी, शेळी, डुक्कर, घोडा, शिंगरू, खेचर, गाढव, उंट, कुत्रा, ससा, हत्ती आणि कुक्कुट पक्षी जसे की कोंबडे-कोंबड्या, बदक, टर्की आणि इमू, क्वेल, गिनी, शहामृग तसेच इतर कुक्कुटपक्ष अशा सोळा प्रकारच्या प्राण्यांची जागेवर मोजणी करण्यात येत आहे. तसेच भटकी कुत्री, गटक्या गाई आणि प्रथमच भटका पशुपालक समुदाय (पॅस्टोरल कम्युनिटी) यांची देखील माहिती गोळा करण्यात येत आहे.
जिल्ह्यात 226 प्रगणक व 54 पर्यवेक्षककांकडून पशुगणना : डॉ. दिनकर बोर्डे
प्रशिक्षण देण्यात आलेले प्रगणक घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन पशुगणना करत असून घरोघरी जाऊन पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याबाबतचे आवाहन केले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली आहे.
जिल्ह्यात सध्या इतकी आहे गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्याची संख्या
सातारा जिल्ह्यात सध्या पशु संवर्धन विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या जनावरांची संख्या ही लाखांच्या संख्येने आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, डुक्कर आढळतात. पशु संवर्धन विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार यामध्ये गायीची संख्या ३ लाख ५२ हजार ४३६, म्हैशी ३ लाख २६ हजार ८९६, शेळ्या ३ लाख ६४ हजार ३४८, मेंढ्या १ लाख ८५ हजार ९०५ तसेच डूक्कर ३१३ इतकी संख्या आहे.
पशुगणना पुढील ५ वर्षासाठी अत्यंत उपयुक्त
राज्यामध्ये नुकतीच २५ नोव्हेंबरपासून केंद्र पुरस्कृत २१ वी पशुगणना सुरू करण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभागाकरिता अत्यंत महत्त्वाची गणना असून सदर गणने मधून प्राप्त होणारी माहिती पुढील पाच वर्ष नियोजन, धोरणात्मक निर्णय व विविध योजनांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.