सातारा प्रतिनिधी | कुमठे ता. सातारा गावच्या हद्दीत दारूची अवैध वाहतूक प्रकरणी बोरगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दुचाकी, दारू व मोबाईल असा 2 लाख 14 हजार 340 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रथमेश शिवाजी ठोंबरे (रा. जकातवाडी) व सचिन ज्ञानेश्वर चव्हाण (रा. वेचले, ता. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कुमठे गावच्या हद्दीत शेळकेवाडी ते शेरेवाडी जाणार्या रोडवर बस स्टॉपजवळ संशयित अवैध दारूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी दोघांना अटक केली.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, हवालदार दीपककुमार मांडवे, सत्यम थोरात, संजय जाधव, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रशांत चव्हाण, सतीश पवार, अतुल कणसे, केतन जाधव यांनी ही कारवाई केली.