सातारा प्रतिनिधी | रमाई घरकुल निर्माण जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत बैठकीत एकुण रमाई आवास (ग्रामीण) योजनेंतर्गत 714 घरकुलांना मंजूरी देण्यात आली, अशी माहिती सहायक आयुक्त समाज कल्याण सातारा यांनी दिली.
बैठकीस फलटण विधानसभा मतदार संघ, आमदार सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, याशनी नागराजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जिल्हा प्रकल्प संचालक उपस्थित होते.
सन 2024-25 मध्ये रमाई आवास घरकूल योजनेसाठी ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी रु.1.20 लाख रुपये अनुदान अनुज्ञेय आहे. या मंजूर घरकुलांना 8 कोटी 56 लाख 80 हजार रुपये एवढा खर्च येणार आहे.
सातारा जिल्हयामध्ये मंजूर केलेल्या घरकुलांचा तालुकानिहाय मंजूर घरकूलांची तपशिल पुढीलप्रमाणे
सातारा-16, कोरेगाव- 53, जावली- 18, वाई -22, महाबळेश्वर-15, खंडाळा-14, फलटण-160, माण-80, खटाव-76, कराड-150, पाटण-110.