देशातील पहिल्या महाबळेश्वरातील हनी पार्कचे थाटात झाले उद्घघाटन

0
423
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | संतोष गुरव

मधाची निर्मिती, संशोधन व अभ्यास तसेच ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी देशातील पहिला हनी पार्कची निर्मिती महाबळेश्वरमध्ये करण्यात आली आहे. ते दुसऱ्या हनी पार्कची (Honey Park) मुंबईत करण्यात आली आहे. यातील महाबळेश्र्वरमधील हनी पार्कचे आज महाबळेश्वर येथील मध संचालनालयात मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घघाटन करण्यात आले.

यावेळी सभापती रवींद्र साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी रेश्मा माळी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, संचालक रघुनाथ नारायणकार आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाने सीएसआर निधी उभारून मध उत्पादनाला चालना देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सहा लाखांच्या सीएसआर निधीमधून महाबळेश्वर येथील मध संचालनालयाच्या आवारातील तीन एकर जागेत मधुबन हा हनी पार्क उभारला आहे. या पार्कमध्ये ३० मधपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. मधपेट्यांसह मध संकलन यंत्र, मध प्रक्रिया, स्वार्मनेट, राणी माशी पैदास उपकरण, पोलन ट्रॅप, ॲटी वेल एंड फिंडिंग, बी व्हेल आदी उपकरणे ठेवण्यात आली आहेत. मधमाश्यांचा अभ्यास करण्यासाठी येणारे शेतकरी, मधपाळ, शालेय सहलींमधून येणारे विद्यार्थी आणि पर्यटक आदींना एकाच ठिकाणी मध उत्पादनाची सर्व माहिती प्रात्यक्षिकांसह मिळणार आहे.

महाबळेश्वर येथील मध संचालनालय एक्सलन्स सेंटर व्हावे, असा प्रयत्न महामंडळाच्या माध्यमातून सुरू आहे. तसेच मुंबईतील बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दुसरे मधुबन हनी पार्क उभारण्यात आला असून त्याचे देखील नुकतेच उद्घघाटन करण्यात आले. संबंधितांना एकाच ठिकाणी मध उत्पादनाची माहिती मिळणार आहे. उद्यानात माकडांची संख्या जास्त आहे. शिवाय पावसाळ्यातील संभाव्य समस्या आणि फुले अथवा मकरंदाची उपलब्धता पाहून स्थळनिश्चिती केली जात आहे. महाबळेश्वर येथे कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. उद्यानात कुशल मनुष्यबळ नसल्यामुळे रोजगाराची गरज असलेल्या आदिवासी महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांची नेमणूक केली जाणार आहे.

हनी पार्कच्या निर्मितीतून महाबळेश्र्वरच्या प्रयत्नात भर : बिपिन जगताप

राज्यात मधाची निर्मिती, संशोधन व अभ्यास तसेच ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी देशातील पहिला हनी पार्क निर्मिती महाबळेश्वरला उभारण्यात आला आहे. या पार्कचे आज मान्यवरांच्या हस्ते उद्घघाटन करण्यात आले. या पार्कच्या माध्यमातून मध उत्पादन व मधमाशीबाबत सर्व माहिती मिळणार असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.

मांघर हे गाव देशात मधाचे गाव

महाबळेश्वर परिसर हा स्ट्रॉबेरीसाठी देशभर ओळखला जातो आणि याच परिसरातील भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध झाले. आता याच महाबळेश्वर परिसरातील मांघर हे गाव देशात मधाचे गाव म्हणून ओळखले जात आहे. राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मधाचे गाव हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला असून त्यासाठी महाबळेश्वरनजीक असलेल्या मांघर गावाची निवड करण्यात आल. मांघर हे महाबळेश्वरपासून ८ किलोमीटर अंतरावर डोंगर कडय़ाखाली वसलेले गाव आहे. गावाच्या भोवताली घनदाट जंगल असून या ठिकाणी वर्षभर फुलोरा असतो. गावात सामूहिक मधमाशांचे संगोपन केले जाते. मधमाशांच्या परपरागीकरणामुळे पिकांची उत्पादकता वाढते. गावातील ८० टक्के लोक मधमाशी पालनाचा व्यवसाय करतात.