सेवानिष्ठता हा सर्वोच्च भाव तुकाराम कदम तात्यांनी जोपासला : प्राचार्य सुहास साळुंखे

0
211
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे ग्रंथालय परिचर तुकाराम कदम यांचा सेवागौरव समारंभ नुकताच पार पडला. यावेळी कृतज्ञता देवत्वाला नेते. याचे मूळ सेवाभावात आहे. खंभीर, विश्वासू, वृत्तीमुळे तुकाराम कदम (तात्या) यांनी सर्वांच्या मनात सर्वोच्च स्थान मिळविले, असे मत लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सुहास साळुंखे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश घाटगे होते. यावेळी प्राचार्य साळुंखे म्हणाले, अनेक मोठ्यांच्या सानिध्यात राहूनही तात्या एकदम सामान्य म्हणून जगत होते. मिळालेली नोकरी म्हणजेच भाकरी असून तिच्या प्रती कर्तव्य तत्पर राहणे ही आपली जबाबदारी आहे हे त्यांनी स्वतःमध्ये बिंबवले होते. आज जमलेले नातेवाईक, मित्र, सहकारी व तात्यांवर निस्सिम प्रेम करणारे यांची गर्दी ही तात्यांच्या विशाल जनसंपर्काची साक्ष आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सतीश घाटगे म्हणाले, निर्मिकाने तयार केलेले तात्या हे एक निष्ठावान व्यक्तिमत्व निर्माण केली यापैकीच एक तात्या आहेत . त्यांच्या ठिकाणी असलेल्या अनुभवांची शिदोरी यामुळे ते परिपूर्ण आहेत. सेवेप्रति त्यांची असणारी तळमळ व जागरूकता, प्रामाणिकपणा ही त्यांना यशस्वी करण्यासाठी कारणीभूत ठरली.

यावेळी प्राध्यापक सुभाष कांबळे , प्रा. संभाजी पाटील प्रशासकीय सेवक एस. एम.पाटील, कदम सर आदींनी आपली मनोगत व्यक्त केले. सेवा गौरव समारंभाचे गौरव मूर्ती तुकाराम कदम म्हणाले, मी संस्थेने दिलेली भाकरी म्हणजे नोकरीप्रती इमान – इतबारे काम केले. जी मदतीला आली व आदरयोग्य आहेत अशांना हृदयात साठवले. काटकसर, वरिष्ठांच्या प्रति आदर आणि संयम यामुळे मी माझी प्रदीर्घ सेवा पूर्ण केली.

प्रस्ताविक प्राध्यापक सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुरेश यादव यांनी केले तर आभार पर्यवेक्षक सुरेश राजपूत यांनी मानले. यावेळी सीनियर,ज्युनिअर चे सर्व विभागाचे प्रमुख प्राध्यापक वर्ग प्रशासकीय सेवक तात्यांचे नातेवाईक व मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होता.