फलटण ते पंढरपूर रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे महत्वाची विधान; म्हणाले की…

0
418
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नुकतीच भेट घेतली. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे विभागाच्या तयारीतील प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी मंत्री वैष्णव यांनी निंबाळकर यांना एक महत्त्वपूर्ण माहिती दिली. फलटण ते पंढरपूर दरम्यान रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी मंत्री वैष्णव म्हणाले की, फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गाच्या कामाला वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व प्रयत्न केले जात आहेत. या मार्गावरील रेल्वे सेवा सुरू झाल्याने न केवळ धार्मिक यात्रेकरूंना, तर स्थानिक नागरिकांनाही फायदा होणार आहे.

स्थानिक नागरिक आणि व्यापारी समुदाय या घोषणेमुळे अत्यंत उत्साहित आहेत. रेल्वे सेवा सुरू झाल्याने पंढरपूरच्या आर्थिक विकासाला चांगला हातभार लागणार आहे. व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधी वाढणार आहेत, ज्यामुळे स्थानिक समुदायाला मोठा लाभ होणार आहे.

रेल्वे विभागाकडून या मार्गावरील सर्व पायाभूत सुविधा पूर्ण करण्यात येत आहेत. रेल्वे स्टेशन्स, सिग्नलिंग सिस्टम, ट्रॅक लेआउट आणि इतर आवश्यक कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. या सर्व प्रयत्नांमुळे लवकरच यात्रेकरू आणि नागरिकांना रेल्वे सेवेचा लाभ घेता येईल, असे मंत्री वैष्णव यांनी म्हंटले.