खंडोबाच्या पालला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळणार; मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना ‘हे’ निर्देश

0
627
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | मुंबईत मंत्रालयात कराड तालुक्यातील पाल येथील ‘ब’ वर्ग देवस्थान येथे पर्यटन विकास आराखडा तयार करण्याबाबत व ‘पर्यटन पोलिस’ या विषयासंदर्भात नुकतीच आढावा बैठक पार पडली. यावेळी पाल देवस्थानाला पर्यटन स्थळ घोषित करण्यासंदर्भात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

यावेळी उत्तर कराडचे आमदार मनोज घोरपडे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, पर्यटन विभागाचे उपसचिव पवार, पर्यटन संचालनालयाचे संचालक बी. एन. पाटील आदी उपस्थित होते.

पर्यटन मंत्री देसाई म्हणाले, ‘पाल’ला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यासाठी सर्व तांत्रिक बाबींचा विचार करुन परिपूर्ण प्रस्ताव एक महिन्याच्या आत सादर करावा. तसेच पर्यटनासाठी शासकीय जागेस प्राधान्य देण्यात यावा.

कराड तालुक्यातील पाल देवस्थान ‘ब’ वर्गाचे देवस्थान आहे. या देवस्थानाला येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी असून त्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ‘पाल’ देवस्थानाचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून करणे आवश्यक असल्याचे मंत्री देसाई यांनी म्हंटले आहे.