…तर जिल्ह्यातील 58 हजार ‘निराधार’च्या बहिणींना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ

0
1450
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शासनाकडून संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभ मिळणाऱ्या अनेक महिलांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर केला होता. अनेक महिलांना सदर योजनेचा लाभ मिळण्यासही सुरुवातही झाली व लाभ मिळत आहे. मागील वर्षीपासून लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे. मात्र, निराधार योजनेतून मदत घेणाऱ्या लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले असतील, त्यांना निराधार योजनेचे पैसे मिळणे बंद होणार आहे.

जे लाभार्थी शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत. असे असताना शासनाच्या लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत आहेत. त्यामुळे आता कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत आहे. जे लाभार्थी कागदपत्रांची पूर्तता करणार नाहीत, अशा लाभार्थ्यांना येत्या फेब्रुवारी महिन्यापासून मदत बंद होईल.

जिल्ह्यात निराधार योजनेचा लाभ घेणारे हजार लाभार्थी

शासनाकडून अनेक वर्षांपासून निराधार लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येतात. यात संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यात निराधार योजनेचा लाभ घेणारे ५८ हजार २११ लाभार्थी आहेत. मात्र, आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्यांना वगळण्यात येणार आहे. निराधार लाभार्थ्यांना मदत थेट बँक खात्यात मिळण्यासाठी केवायसीसह इतर कागदपत्रांची पडताळणी होत आहे.

आधार, बँक पासबुक जमा करण्याची प्रक्रिया सुरू

सातारा जिल्ह्यात निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची कागदपत्रे जमा करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक लाभार्थ्यास आधार 3 केवायसी, बँकेचा तपशिलासह प्रतिज्ञापत्र प्रशासनाकडे जमा करण्याची मोहीम सुरू आहे.

कागदपत्रे जमा न केल्यास होणार बंद

सातारा जिल्हा प्रशासनाकडून निराधार लाभार्थ्यांची कागदपत्रे जमा करण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. कागदपत्रे जमा न करणाऱ्यांना मदतीपासून मुकावे लागेल.

ऑगस्टपासून मोहीम सुरू

सातारा जिल्ह्यातील निराधार लाभार्थ्यांची कागदपत्रे जमा करण्यासाठी मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून मोहीम सुरू आहे.

निराधार योजनेस पसंती

लाडकी बहीण योजनेला अन्य योजनेचा लाभार्थी नसावा, अशी अट आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणे टाळले आहे.

सातारा जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती लाडक्या बहिणी लाभार्थी

सातारा तालुका : ७६ हजार ४११ लाभार्थी
जावली तालुका : २० हजार ८४३ लाभार्थी
कोरेगाव तालुका : ५० हजार ५८० लाभार्थी
माण तालुका : ३४ हजार ८८५ लाभार्थी,
खटाव तालुका : ४८ हजार ८६८ लाभार्थी
वाई तालुका : ३६ हजार ७२५ लाभार्थी
खंडाळा तालुका : २३ हजार ८३२ लाभार्थी
महाबळेश्वर तालुका : १० हजार ५६९ लाभार्थी
फलटण तालुका : ५८ हजार ३७७ लाभार्थी
पाटण तालुका : ५९ हजार ११४ लाभार्थी
कराड तालुका : ९८ हजार २४७ लाभार्थी
एकूण लाभार्थी : ५ लाख १८ हजार ४५१
एकूण जमा झालेली रक्कम : ७७ कोटी ७६ लाख ७६ हजार ५०० रुपये