सातारा प्रतिनिधी । अनुभव फिल्म क्लबच्यावतीने सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जेष्ठ अभिनेते व निर्माते डॉ. मोहन आगाशे यांचा कलाकारांशी सुसंवाद झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मानिका देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष शिरीष चिटणीस होते तर खजिनदार मकरंद जोशी, उपाध्यक्ष ऍड.गिरीश कुलकर्णी, सहसचिव डॉ.सारिका देशपांडे, सौ.शिल्पाताई चिटणीस, कार्यकारीणी सदस्य, डॉ.संदीप श्रोत्री यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार व सिनेरसिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
यावेळी डॉ.मोहन आगाशे म्हणाले, “चित्रपट हे हसत,खेळत व चिमटे काढणारे असावेत.मानवाने जीवनही कोणताही ताण-तणाव न घेता आनंददायी जगले पाहिजे.आपल्या कलेचा आविष्कार समाजासाठी असला पाहिजे.चित्रपट कलेचे माध्यम आहे.मात्र,त्यासाठी संवाद झाला पाहिजे.नजरेची व आवाजाची भाषा ही समजूतदार असावी. शब्दांची भाषा ही बुद्धीची असते. कोणत्याही प्रकारची चळवळ सुरू होत नाही.
अभिनेत्री शर्मिला टागोर आजची नाही.तर ती होऊन गेलेली आहे.” पुणे शहरात एकाआड निवासस्थानात ज्येष्ट मंडळी आढळून येत आहेत.तिथे सर्व सुविधा मिळत असल्याचाही दाखला देत पुणेकर असल्याचही डॉ.आगाशे यांनी सांगितले. सुंदर चित्रपटांची मेजवानी या २०२५ च्या स्वागतात सातारकर चित्रपट रसिकांसाठी ‘अनुभव फिल्म क्लब’द्वारे करण्यात आली होती. सचिव राजभूषण सहस्त्रबुद्धे यांनी सूत्रसंचालन केले.