3 विमानतळे अन् सी प्लेन प्रकल्पसह नवीन महाबळेश्वर उभारणीत ‘या’ असणार गोष्टी

0
1856
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पर्यटन स्थळाच्या ठिकाणी आमूलाग्र बदल करण्याच्या तसेच नवनवीन प्रकल्प आणण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील मंत्र्यांकडून पर्यटन केले जाऊ लागले आहेत. अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या सातारा जिल्ह्यातील नवीन महाबळेश्वर प्रकल्पबाबत आता महत्वाची माहिती अमोर आली आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला असून महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाच्या शेजारीच कोयना बॅकवॉटरला लागून ११५३ चौरस किमी क्षेत्रफळावर नवीन महाबळेश्वर गिरिस्थान उभारले जात आहे. या प्रकल्पात बाजे, उरमोडी आणि तापोळा या तीन ठिकाणी छोटी व्यावसायिक विमाने उतरविण्यासाठी धावपट्ट्या उभारल्या जाणार आहेत. तर उरमोडी आणि तापोळा या दोन ठिकाणी सी प्लेन उतरविण्यासाठी धावपट्ट्यांची उभारणी केली जाणार आहे.

राज्यातील मोठं मोठे प्रकल्प तयार करणाऱ्या ‘एमएसआरडीसी’च्या वतीने नुकताच नवीन महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पाचा प्रारूप विकास आराखडा नागरिकांच्या सूचना, हरकतींसाठी जाहीर केला आहे. त्यामध्ये या नवीन गिरिस्थानात विमानतळे उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. ‘एमएसआरडीसी’ च्या वतीने राज्यातील महत्वाचे कोयना धरण असलेल्या पाटण तालुक्यातील बाजे येथे ०.४५ किमी ते २ किमी अंतराचे छोटे विमानतळ उभारण्याचा प्रयत्न आहे. बाजे विमानतळामुळे वाल्मिकी पठार, कोयना धरण, हेळवाक या परिसरात सहजरीत्या पोहोचता येईल.

उरमोडी येथे दोन किमी लांबीची पाण्यावरील धावपट्टी साकारली जाणार आहे. तसेच ५०० मीटरचा पाण्याचा भाग हा विमाने वळविण्यासाठी ठेवला जाणार आहे. तसेच तापोळा येथेही अशा प्रकारे सी प्लेन उतरविण्याची सुविधा उभारबाबत निर्णय विचाराधीन आहे. दरम्यान,उरमोडी सी प्लेन प्रकल्पामुळे बामणोली, ठोसेघर, कास पठार आदी भागांत पर्यटकांना काही वेळेतच पोहोचता येणार आहे.

१३ हजार कोटींचा खर्च

सातारा जिल्ह्यातील नवीन महाबळेश्वर प्रकल्पात टुरिस्ट पॅराडाईज, पर्यटन आणि निसर्ग संपदा विकास केंद्रांचा विकास साधून पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. यामध्ये छोटी विमानतळे, सायकल ट्रॅक, रोपवे, फर्निक्युलर रेल्वे आदींचा समावेश आहे. यासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी, तसेच विविध सोयीसुविधांचा विकास साधण्यासाठी तब्बल १२,८०९ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

‘डार्क स्काय पार्क’ म्हणजे नेमकं काय?

IDSA च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार डार्क स्काय पार्क म्हणजे असं क्षेत्र जिथे फक्त नैसर्गिक प्रकाश असेल, कृत्रिम प्रकाशाचा अभाव असेल त्या ठिकाणची हवा प्रदुषणमुक्त असेल ज्यामुळे आकाश सहज न्याहाळता येईल. महत्त्वाचं म्हणजे ही परिस्थिती कायम रहावी यासाठी या भागात प्रयत्न केले जातील. असा परिसर आकाश निरिक्षणासठी उत्तम म्हणून जाहीर केला जातो आणि त्याच भागाला डार्क स्काय पार्क असं म्हणतात. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अरळ आणि काठी या भागात डार्क स्काय पार्क आणि अँस्ट्रो व्हिलेज उभारले जाणार आहे. या ठिकाणी खगोलप्रेमींना टेंट उभारून त्यात आकाश न्याहाळता येणार आहे.