सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील वार्ड क्रमांक १७ मधील रस्ता डांबरीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मागणी करुनही तो मार्गी लावण्याबाबत पालिका प्रशासन व बांधकाम विभागाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही, असा आरोप करत बुधवारी सकाळी शिवसेनेचे उपजिल्हा संघटक सादिकअली बागवान यांनी पालिकेत भोंगा बजाओ आंदोलन केले.
याबाबत मुख्याधिकारी अभिजित बापट यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सातारा पालिका व बांधकाम विभाग यांच्या वादाचा फटका प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांना बसला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून येथील नागरिकांना रस्ते, पाणी, दिवा-बत्ती, कचरा, आरोग्य आदी पायाभूत सेवांसाठी झगडावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही प्रश्न सुटत नसल्याने सादिकअली बागवान यांनी बुधवारी सकाळी सातारा नगर पालिकेत येऊन भोंगा बजाओ आंदोलन केले.