कराडच्या विजय स्तंभाला नवी झळाळी; जिल्ह्यात प्रथमच बसले LED कर्ब स्टोन

0
784
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती सदनसमोरील चौकास ‘विजय दिवस चौक’ नाव देण्यात आले. या चौकात ‘अमर जवान’ विजय स्तंभ उभारला आहे. या स्तंभाला आता नवी झळाळी मिळाली असून ‘एलईडी कर्ब स्टोन’ हा रंगीबेरंगी स्टोन स्तंभाच्या भोवती बसविण्यात आलेला आहे. त्यामुळे कर्ब या नव्या तंत्राने विजय दिवस चौकाच्या सौंदर्यात भर पडली आहे.

सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर करून हा उपक्रम राबवला जात आहे. कराड शहराच्या दृष्टीने विजय दिवस चौकाला विशेष महत्त्व आहे. चौकात उभारलेल्या ‘अमर जवान’ स्तंभाकडे पाहिल्यावर शहिदांच्या आठवणींना उजाळा मिळतो. या चौकातील ‘अमर जवान’ स्तंभाचे सुशोभीकरण करण्याची संकल्पना कराडच्या कै. समीर पवार मित्रमंडळाची होती.

विजयस्तंभाला १९ जानेवारी रोजी ‘एलईडी कर्ब स्टोन’ बसवण्यात आले. २६ जानेवारी २०२५ रोजी त्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे. विजय स्तंभाला बसवण्यात आलेली आधुनिक एलईडी एवढी मजबूत आहे की ती २०० टनाचा भार सहन करू शकते. दिवसा हे रंगीबेरंगी दिसत असल्याने वाहनधारकांना सहज नजरेस पडणार आहे. सायंकाळनंतर त्याच्यात एलईडी लाईट लागल्यानंतर या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. शिवाय हे बसवल्यानंतर देखभाल दुरुस्तीचा खर्च नाही. पावसाळ्यातही हे टिकून राहणार आहे. रविवार दिनांक १९ रोजी रात्री याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.