नाराजीचा चर्चेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडली रोखठोक भूमिका;म्हणाले की, अपेक्षा करण्यात…

0
88

सातारा प्रतिनिधी । राज्यातील जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या पालकमंत्रीपदाबाबत शनिवारी सरकारकडून घोषणा करण्यात आली. मात्र, पालकमंत्रीपद वाटपावरून महायुतीत शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे पहायला मिळत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी दरे येथे रविवारी आले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद नाराजीच्या चर्चेवर रोखठोक भूमिका मांडली आहे. “अपेक्षा करण्यात वावगं काय आहे? भरत गोगावले यांनी रायगडमध्ये अनेक वर्षे काम केलं आहे. त्यांनी अपेक्षा ठेवणं आणि मागणी करणं चुकीचं नाही. मी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असे आम्ही तिन्ही नेते बसून यावर मार्गकाढू. पालकमंत्रिपदाचा जो तिढा सुरू आहे त्यावर लवकरच तोडगा निघेल,” असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

सातारा जिल्ह्यातील दरे गावी मुक्कामी असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “मी नाराज झाल्याच्या बातम्या चालवल्या जात आहे, पण तुम्हीच बघत आहेत की मी तर काम करतोय. नवीन महाबळेश्वरचा प्रोजेक्ट आपण हाती घेतलाय. हा प्रोजेक्ट मोठा असल्याने मला वारंवार गावी यावं लागणार आहे.

पर्यटनाचा जिल्हा म्हणून साताऱ्याची ओळख निर्माण होईल. यासाठी जे कष्ट घ्यायचे असतील ते इथला एक भूमिपुत्र म्हणून मी घेईल, असे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे. दरम्यान, नाराज झालेले एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी दरे येथे रविवारी आले असल्याने अशात त्यांनी रोखठोक भूमिका मांडल्याने त्यांच्या भूमिकेची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच सुरु झाली आहे.