सातारा जिल्ह्यात 3 महिन्यात रब्बी पीककर्जाचे ‘इतके’ टक्के वितरण

0
6

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात रब्बी हंगामातील कर्जवाटप सुरू होऊन तीन महिने उलटले आहेत. या तीन महिन्यांत जिल्ह्यातील बँकांनी अवघे २१ टक्के पीककर्जाचे वितरण केले आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी १२८० कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी ३१ डिसेंबरअखेर १४ हजार ८१ शेतकऱ्यांना २६५ कोटी चार लाख रुपये कर्जाचे वितरण केले आहे. गेल्या तीन महिन्यांत अवघे २१ टक्के कर्ज वितरण झाले.

खरीप हंगामात उद्दिष्टांच्या ९४ टक्के बँकांनी कर्जवाटप केले होते. या कर्जवाटपात जिल्हा बँकेचा सर्वाधिक १२० टक्के वाटा आहे. तर राष्ट्रीयीकृत बँकानी ७६ टक्के व खासगी बँकांनी उद्दिष्टाच्या ४९ टक्के वितरण केले होते. मात्र रब्बी हंगामात या बँकांनी कर्ज वाटप गार्भीयांने घेऊन उद्दिष्टांच्या ५३ टक्के कर्ज वितरण केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांना ३१२ कोटी ९० लाखाचे उद्दिष्ट असून, यापैकी १६४ कोटी ९३ लाख रुपयांचे कर्जकर्ज वितरण केले आहे. तर खासगी बॅंकाना १६५ कोटी ९० लाखांचे उद्दिष्ट असून, यापैकी ८८ कोटी ३० लाख रुपयांचे कर्जकर्ज वितरण केले आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेस ८०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी या बँकेने ११ कोटी ७८ लाख रुपये म्हणजे उद्दिष्टाच्या एक टक्के कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. रब्बी कर्ज वितरण सुरू होऊन तीन महिने उलटले. कर्ज वितरणाची मार्च अखेरपर्यंत मुदत आहे. उर्वरित कालवधीत किती कर्जवाटप होईल, हे पाहावे कर्ज वितरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.