सातारा जिल्ह्याचे विभाजन होणार नाही : जिल्हाधिकारी संतोष पाटील

0
12

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर संतोष पाटील यांनी नुकताच प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सातारा जिल्ह्याची ओळख ही ऐतिहासिक जिल्हा अशी आहे. सातारा जिल्ह्याचे गेल्या काही दिवसांपासून विभाजन होणार अशी चर्चा आहे. परंतु असा कोणताही प्रस्ताव, निवेदन किंवा सरकारकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सोशल मीडियावर याची अफवा पसरवली जात आहे. अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन नूतन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी पाटील म्हणाले की, सातारा जिल्ह्यात पर्यटन हा महत्त्वाचा भाग आहे. जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास होण्यासाठी नवीन धोरण आखून जास्तीत जास्त सोयी सुविधा पुरवण्यावर भर देणार आहे. जिल्ह्याचे पर्यटन वाढले तर रोजगार वाढून स्थानिकांना उत्पन्नाचा नवा मार्ग मिळले. यामुळे जिल्ह्याच्या विकासातही भर पडेल.

तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या कार्यकाळात स्मार्ट शाळा व इतर नवीन उपक्रम, योजना जिल्हास्तरावर राबवल्या. त्या पूर्ण करण्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणार आहे. लोकांच्या अडचणी सोडवण्यावर भर देणार आहे. जिल्ह्यातील यात्रा येथे पार्किंगची व्यवस्था करणे, मुलभुत सोयी पुरवणे, योग्य व्यवस्थापन करणे यावर भर देणार आहे. महिलांसाठी ज्या योजना आहेत. त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचवणे. त्याचा लाभ मिळवून देणे यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. सातारा जिल्ह्याचे विभाजन होणार अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. परंतु राज्यपातळीवर अद्याप असा कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे लोकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. सोशल मीडियावर व्हायरल झालेला नकाशा खोटा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.