वडूज पोलिसांची गुटखा विक्रेत्यावर कारवाई; 8 हजार रुपयांचा गुटखा जप्त

0
47
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील कलेढोण येथील बाजार चौकात असलेल्या पानटपरीवर छापा टाकत वडूज पोलिसांनी विक्रेत्यावर कारवाई केली असून त्याच्या ताब्यातील 8 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

13 रोजी वडूज पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी कलेढोण येथे गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सपोनि विक्रांत पाटील आणि त्यांच्या टीमला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी छापा टाकला असता सिंकदर पान शॉपमध्ये झडती घेतली असता पांढर्‍या रंगाचे पोत्यामध्ये विमल पान मसाला आढळून आला.

पोलिसांनी तो ताब्यात घेत जमीर रमजान तांबोळी (वय 40) व उस्मान रमजान तांबोळी (दोन्ही रा. कलेढोण) गुन्हा दाखल केला. ही कारवाई वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मायणी पोलीस दूरक्षेत्राचे सपोनि विक्रांत पाटील,बिट अंमलदार आनंदा गंबरे व टीमने केली.